मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून एकूण 66 हजार 433 अर्ज लाभाकरिता पात्र ठरले आहेत.
बारामती : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) दोन महिन्यांचे पैसे बारामतीतील काही महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या योजनेसंदर्भात दिलेला शब्द पाळल्याबद्दल बारामतीतील 25 हजार महिला भगिनी त्यांना रक्षाबंधनानिमित्त (Rakshabandhan) 25 हजार राख्या पाठविणार आहेत.