मार्केट यार्ड - गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दि पुना मर्चंट्स चेंबरकडून मागील अनेक वर्षांपासून ‘रास्त भावात लाडू-चिवडा विक्री’ चालविण्यात येतो. या उपक्रमाची सुरुवात गुरुवारपासून (ता.२४) सुरू होणार आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत किलोमागे २० रुपयांची वाढ झाली आहे.