भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आज लाखोंचे अभिवादन

अनुयायी येण्यास सुरुवात; जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्णत्वास
भीमा कोरेगाव विजयस्तंभाला आज लाखोंचे अभिवादन
Updated on

कोरेगाव भीमा : शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाची फुलांची सजावट पूर्ण केली असून, अभिवादनासाठी रविवारी (ता.३१) अनुयायी येण्यास सुरुवात झाली आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी प्रमुख आनंदराज आंबेडकर व इतर पदाधिकाऱ्यांनी विजयस्तंभाला अभिवादन करून सुविधांचा आढावा घेतला.

अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) व पेरणे (ता. हवेली) परिसरात येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत, याबाबतची ग्वाही जिल्हा प्रशासनाने दिली असून यावर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांबरोबरच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुविधेकरिताही जिल्हा प्रशासनाने वाढीव संख्येने जय्यत तयारी पूर्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ‘बार्टी’चे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी तयारीचा आढावा घेत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांना सूचनाही दिल्या आहेत.

दरम्यान, विजयस्तंभ परिसरात रविवारी मध्यरात्रीपासून आतषबाजी तसेच सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात होईल. सकाळी ६.३० वाजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील. ७.३० वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली जाईल.

नगर रस्त्यावर वाहनांना बंदी

जिल्हा प्रशासनाने काल सायंकाळी पाच पासूनच वाहनांवर निर्बंध घालणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र गर्दीअभावी निर्बंध शिथिल केल्याने रविवारी सायंकाळीपर्यंत नगर रस्त्यावर वाहतूक सुरू होती. रविवारी रात्रीनंतर नगर रस्त्यावर वाहनबंदी करण्यात आली. अनुयायांकरीता २९ ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून २० फिरते बाईक आरोग्य पथके, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर्स व २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह १०० खाटाही आरक्षित करण्यात आल्या आहे. सोहळ्यास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सोहळा पाहता यावा यासाठी सह्याद्री वाहिनीवरून एक जानेवारी रोजी सकाळी सहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

अनुयायांकरीता २९ ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून २० फिरते बाईक आरोग्य पथके, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर्स व २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह १०० खाटाही आरक्षित करण्यात आल्या आहे. सोहळ्यास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सोहळा पाहता यावा यासाठी सह्याद्री वाहिनीवरून एक जानेवारी रोजी सकाळी सहा ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.