Pune: हाकेंवर कारवाईसाठी मराठा आंदोलक आक्रमक, पोलिस ठाण्यात गोंधळाचे वातावरण

Pune Crime: मनोज जरांगे-पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेल्या विधानावरून काही तरुणांनी त्यांना जाब विचारला
Pune: हाकेंवर कारवाईसाठी मराठा आंदोलक आक्रमक, कोंढवा पोलिस ठाण्यात गोंधळाचे वातावरण
Pune: हाकेंवर कारवाईसाठी मराठा आंदोलक आक्रमक, कोंढवा पोलिस ठाण्यात गोंधळाचे वातावरण sakal
Updated on

Latest Pune News: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यसेवन केल्याचा आरोप करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार कात्रज-कोंढवा परिसरात सोमवारी रात्री घडला. काही मराठा आंदोलकांनी हाके यांना जाब विचारला.

त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद काही प्रमाणात निवळला.

हाके सोमवारी सायंकाळी पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात आले होते. हाके यांनी काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेल्या विधानावरून काही तरुणांनी त्यांना जाब विचारला. या वेळी काही तरुणांनी हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोपही केला.

Pune: हाकेंवर कारवाईसाठी मराठा आंदोलक आक्रमक, कोंढवा पोलिस ठाण्यात गोंधळाचे वातावरण
Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने

त्यावरून त्यांच्यातील वाद वाढत गेला. कोंढवा पोलिस ठाण्यात आल्यानंतर मराठा आंदोलकांनी हाके यांच्या वैद्यकीय तपासणीची मागणी लावून धरली. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत गोंधळाचे वातावरण होते. पोलिसांनी आंदोलकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले. तसेच, हाके यांची वैद्यकीय चाचणी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत एकेरी भाषेत उल्लेख करून मराठा समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे छत्रपती यांना शिवीगाळ का केली, याचा जाब विचारल्यानंतर त्यांनी जीवेमारण्याची धमकी दिली.

मराठा सेवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा अर्ज देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. हाके यांची वैद्यकीय चाचणी करावी, तसेच गृह विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Pune: हाकेंवर कारवाईसाठी मराठा आंदोलक आक्रमक, कोंढवा पोलिस ठाण्यात गोंधळाचे वातावरण
Pune Crime: पुण्यात' या' राजकीय नेत्याला आली जीवे मारण्याची धमकी,गुन्हा दाखल

‘‘मी मद्यसेवन केलेले नाही. मी कोणतीही चाचणी करायला तयार आहे. मी मद्य पिल्याचा आरोप करून कोणी ओबीसींचा आवाज दडपू शकत नाही.

हा कट पूर्वनियोजित होता. दोघेजण माझ्या मागावर होते, त्यांनी मला जबरदस्तीने मद्य पिल्याचे वदवून घेण्याचा प्रयत्न केला. समूहाकडून मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात मी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.’’

- लक्ष्मण हाके, ओबीसी आंदोलक

‘‘आम्ही दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांनी परस्परविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. याबाबत ⁠अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. हाके यांनी मद्यप्राशन केले की नाही, हे आता सांगता येणार नाही. वैद्यकीय चाचणीनंतर ते स्पष्ट होईल.’’

- आर. राजा, पोलिस उपायुक्त, पुणे

Pune: हाकेंवर कारवाईसाठी मराठा आंदोलक आक्रमक, कोंढवा पोलिस ठाण्यात गोंधळाचे वातावरण
#TrafficUpdates : पुणेकरांनो...'या' रस्त्यावर आहे सध्या वाहतूक कोंडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.