Lalit Patil Case: पोलीस, ससूनसह आता जेल प्रशासनाचीही भूमिका संशयास्पद! अधीक्षकांचं पत्र आलं समोर

ललित पाटील प्रकरणात पोलीस, ससूनसह आता कारागृह प्रशासनाचीही भूमिका संशयास्पद; कारागृह अधीक्षकांचं पत्र आलं समोर
lalit patil drugs case
lalit patil drugs caseEsakal
Updated on

ड्रग माफिया ललित पाटीलला १५ दिवस ससून रूग्णालयात ठेऊन घेण्यासाठी दिलेलं कारागृह अधीक्षकांचं पत्र आता समोर आलं आहे. यामुळे ड्रग माफिया ललित पाटीलला मदत करण्यात येरवडा कारागृह प्रशासन सुध्दा सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. येरवडा कारागृहाच्या मुख्य वैद्यकीय आधिकाऱ्याचं पत्र आता समोर आलं आहे. ३ जून २०२३ ला लिहलेलं हे पत्र आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना उद्देशून हे पत्र लिहण्यात आलं आहे.

या पत्रात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधीक्षक ललित पाटीलला उपचारांसाठी ससून रूग्णालायात दाखल करून घेण्याची आणि किमान १५ दिवस त्याला तिथेच ठेवण्याची विनंती केली आहे. ललित पाटीलला ससूनमधून कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नाही त्यामुळे ललितला ससूनमध्ये १५ दिवस ठेवलं जावं असं या पत्रात नमूद केलेलं आहे.

दरम्यान या पत्रावरती मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. त्यामुळे ललित पाटीलला फक्त ससून मधील डॉक्टर, पुणे पोलिस यांचीच नाही तर कारागृहातील अधिकारी सुध्दा त्याच्या पाठीशी होते असं या पत्रातून दिसून येत आहे. या पत्रामुळे येरवडा कारागृह संशयांच्या भोवऱ्यात अडकले आहे.

lalit patil drugs case
Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल!

ललित पाटीलला ससूनमधून कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नाही त्यामुळे ललितला ससूनमध्ये १५ दिवस ठेवलं जावं असं या पत्रात नमूद केलेलं आहे. यानंतर तब्बल ४ महिने ललित पाटील ससूनमध्ये होता. त्यानंतर तो पसार झाला होता.

दरम्यान आता ससून रूग्णालयाचे प्रशासन यांच्यासोबतच काही पोलिसांनी देखील ललित पाटीलला मदत करत असल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता हे पत्र समोर आले आहे. या प्रकरणी काही डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे, पोलिसांवर कारवाई होत आहे, यासंबधी चौकशी सुरू आहे. आता हे पत्र समोर आल्यानंतर येरवडा कारागृहाचा देखील काही हात आहे का हे पाहण्यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्याची मागणी करण्यात येत आहे.

lalit patil drugs case
Mumbai Crime: कुर्ल्यात सापडलेल्या सुटकेसमधील महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा झाला उलगडा; लिव्ह इन रिलेशनमध्ये...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.