Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट! महिन्याला 200 किलो ड्रग्ज अन्...

या प्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Lalit Patil
Lalit Patil Esakal
Updated on

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा नाशिक इथल्या कारखान्यात महिन्याला २०० किलो ड्रग्ज बनवत होता. यांपैकी एक किलो ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये आहे. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. (Lalit Patil Drugs Case Big update Production of 200 kg of drugs per month)

Lalit Patil
S Jaishankar: परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ; आयबीच्या इशाऱ्यामुळं दिली 'झेड' सुरक्षा

महिन्याला २०० किलो ड्रग्जची निर्मिती

भूषण पाटील आपल्या नाशिक इथल्या कारखान्यात आठवड्याला ५० किलो तर महिन्याला २०० किलो एमडी ड्रग्ज बनवायचा. या १ किलो एमडी ड्रग्जची किंमत १ कोटी रुपये आहे. त्यानंतर विविध भागात डिस्ट्रिब्युशन व्हायचं, असंही कळतं आहे. (Latest Marathi News)

Lalit Patil
Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणी सुप्रीम कोर्टानं निकाल ठेवला राखून; केंद्र, गुजरातला दिले 'हे' आदेश

दोघांना उत्तर प्रदेशातून अटक

दरम्यान, ससून परिसरात २ कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यांना काल सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांचा पीसीआर दिला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Marathi Tajya Batmya)

Lalit Patil
Sharad Pawar: अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार; शरद पवारांचा टोला

नाशिकमध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना

ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण या ठिकाणी ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला.

अद्याप तो पोलिसांच्या हाती आलेला नाही. पण चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.