Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी नुकतेच चेन्नई इथून अटक केली आहे. यानंतर आता ससून रुग्णालयातून पळून जाणं आणि यासाठी त्याला कोणी मदत केली याच्या तपासासाठी पुणे पोलीस देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलीस त्याच्यावर मोक्का अतंर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. (Lalit Patil drugs case Pune Police planning to invoke provisions of mcoca against)
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळून गेल्याप्रकरणी पुणे पोलीस ललित पाटीलची कस्टडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाटील याच्यावर ड्रग्ज रॅकेट चालवण्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल आहेत. (Latest Marathi News)
पिंपरी-चिंचवड, पुणे आणि मुंबई पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. यापार्श्वभूमीवर ललित पाटीलवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मोक्का लावण्याच्या हालचाली पुणे पोलिसांनी सुरु केल्या आहेत.
दरम्यान, ललित पाटील यानं वृत्तवाहिनीच्या कॅमेरॅसमोर दावा केला होता की ससून रुग्णालयातून आपण पळून गेलो नव्हतो तर आपल्याला पळवण्यात आलं होतं. त्याच्या या दाव्यामुळं खळबळ उडाली होती. यावरुन यामागे कोणाचा हात आहे याची चर्चा सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या चौकशीकडं आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Marathi Tajya Batmya)
जर ललित पाटीलला रुग्णालयातून पळून जाण्यात ज्या कोणी सहकार्य केलं असेल त्या व्यक्तीलाही आम्ही ताब्यात घेऊ, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियानं म्हटलं आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी म्हटलं की, ससूनमधून पळून गेल्यानंतर आम्हाला ललितचा फोन नंबर मिळाला पण त्यानं या फोनवरुन कोणालाही फोन केला नव्हता तसेच व्हॉट्सअॅपही वापरलं नव्हतं.
पाटील सोशल मीडिया साईट्सचा वापर आपल्या सहकाऱ्यांना फोन करण्यासाठी करत होता. पण या सोशल मीडिया साईट्सचे कॉल रेकॉर्ड येईपर्यंत मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.