संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या भूसंपादनास आता वेग येणार

palkhi marg
palkhi margsakal media
Updated on

बारामती : कोरोनामुळे रखडलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूसंपादनाचे काम आता पुन्हा वेगाने सुरु होणार आहे. दौंड, बारामती व इंदापूर या तीन तालुक्यातील भूसंपादनाचे काम बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे असून हे काम वेगाने संपविण्याच्या दिशेने सध्या त्यांनी प्राधान्य दिले आहे. या पालखी मार्गात दौंड तालुक्यातील 1222, बारामतीतील 3459 व इंदापूरमधील 3044 असे एकूण 7725 शेतकरी बाधित होणार आहेत. दरम्यान भवानीनगर, सणसर व निमगाव केतकी या गावामधील मोजणी पूर्ण झाली असून संबंधित जागा मालकांच्या आक्षेपावर सुनावणी प्रलंबित आहे. उर्वरित 36 गावांमधील मोजणी होऊन निवाडाही झाला आहे.

palkhi marg
संक्रमणात मुंबई दुसऱ्या तर पुणे दहाव्या क्रमांकावर

दरम्यान या रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात 12, दुस-या टप्प्यात 23 अशी 35 गावे समाविष्ट असून या तीन तालुक्यातील भूसंपादनासाठी जवळपास 1160 कोटी रुपये लागणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हा निधी राज्य सरकारला उपलब्ध होणार आहे. आजपर्यंत काम सुरु झाल्यापासून 227 कोटी रुपयांचे भूसंपादनापोटी वाटप पूर्ण झाले आहे. दरम्यान आगामी 50 कोटी रुपयांचे वाटप नियोजन तयार असून ते काम येत्या महिन्याभरात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. या कामासाठी सध्या 546 कोटी 94 लाखांचा निधी महसूल विभागाकडे जमा आहे, त्यातील 227 कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे. निधीची कसलीच अडचण नसून प्रक्रीया पूर्ण होतात जागामालकांना लगेचच पैसे अदा केले जात आहेत. गावनिहाय कँप घेऊन नुकसान भरपाई वाटप व ताबा घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

palkhi marg
खून प्रकरणातील फरार आरोपीला पुणे जिल्ह्यातुन अटक; हिंगोली पोलिसांची कारवाई

लवकर भूसंपादन पूर्ण करण्यावर भर- या पालखी मार्गाचे भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ते तयार करण्यासाठी देण्याचा प्रयत्न आहे. भूसंपादनासाठी निधीची अडचण नसून काम वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती.

कसा आहे हा मार्ग...

• पाटस ते सराटीपर्यंत चार पदरी महामार्गाची निर्मिती

• या प्रकल्पासाठी 39 गावातील 187 हेक्टर जमीन संपादीत करायची असून 9000 शेतकरी बाधित होतील व त्यांना जवळपास 1160 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

• या मार्गाच्या उभारणीनंतर पालखी मार्ग अधिक विस्तारीत व व्यापक होणार असून सोलापूर व पुणे जिल्हयात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.