Landslide Express Way: पुणे-मुंबई 'एक्स्प्रेस वे'वर पुन्हा कोसळली दरड; वाहतुकीवर परिणाम

महामार्ग पोलिसांचं आयआरबीच्या मदतीनं राडारोडा हटवण्याचं काम सुरु आहे.
Landslide Pune
Landslide Pune
Updated on

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर पुन्हा एकदा दरड कोसळल्याचं वृत्त आहे. मुंबईच्या बाजूला जाणाऱ्या कामशेत बोगद्याच्या तोंडाजवळ ही दरड कोसळली. यामुळं या मार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. रात्री साडे आठच्या सुमारास ही दरड कोसळ्याची माहिती मिळते आहे. (Landslide agin on Pune Mumbai Express way Impact on traffic toward Mumbai)

एका लेनमध्ये दरडीचा राडारोडा आल्यानं मुंबईकडं जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. पण दुसरी लेन सुरु असल्यानं वाहतूक हळुवारपणे सुरु आहे. महामार्ग पोलिसांचं आयआरबीच्या मदतीनं या दरडीचा राडारोडा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती १० वाजेपर्यंत सुत्रांच्या हवाल्यानं मिळाली आहे. (Latest Marathi News)

Landslide Pune
SBI Research: भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार; महाराष्ट्राचा वाटा महत्वाचा!

दरम्यान, गेल्या तीन चार दिवसांपासून या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. कालच दोन तास महामार्ग बंद ठेवत दरडग्रस्त धोकादायक ठिकाणांची दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.

चार दिवसांपूर्वी याच एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली होती. मोठ्या प्रमाणावर राडारोडा रस्त्यावर आल्यानं वाहतुक विस्कळीत झाली होती. आडोशी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दरड कोसळली होती. त्यामुळे डोंगरभागातून मातीचा लगदा महामार्गावरील तिन्ही लेनवरती पडला होता. त्यामुळं पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तिन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.