Pune-Mumbai Expressway Landslide : ‘ब्लास्ट’मुळे कोसळताहेत दरडी? पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील घटनांबाबत शक्यता...

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांत तीन वेळा दरडी कोसळल्या
landslide collapsing due to blast Possibilities incidents on Pune-Mumbai Expressway pune
landslide collapsing due to blast Possibilities incidents on Pune-Mumbai Expressway punesakal
Updated on

- प्रसाद कानडे

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गेल्या काही दिवसांत तीन वेळा दरडी कोसळल्या. तेथील पावसाचे प्रमाण हे सरासरी पर्जन्यमानाइतके आहे. मात्र, यंदा दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. मिसिंग लिंक व रस्त्याच्या अन्य कामांसाठी वारंवार ‘ब्लास्ट’ केले. त्याचा हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.

महामार्ग पोलिसांनी गुरुवारी (ता. २७) दुपारी १२ ते दोन या वेळेत ब्लॉक घेऊन दरड हटविण्याचे काम केले. मात्र, त्याच रात्री कामशेत येथे दरड कोसळली. त्याचा शुक्रवारी वाहतुकीवर परिणाम झाला. गेल्या काही वर्षांपासून ‘मिसिंग लिंक’चे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात बेसॉल्ट खडक फोडला. उन्हाळ्यातही रस्त्यांची कामे काही प्रमाणात झाली. त्यासाठीही ‘ब्लास्ट’ केले. त्याचा हा परिणाम असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘ब्लास्ट’चा परिणाम

२००५ मध्ये कोकण रेल्वेच्या मार्गासाठी बोगदा खणण्याचे काम सुरू होते. महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत हा बोगदा तयार केला जात होता. बोगद्यापासून दासगावचे अंतर दूर होते. मात्र, ब्लास्ट केल्यामुळे दासगावमध्ये दरडी कोसळल्या होत्या.

येथे कोसळली दरड

कुसगाव-खोपोलीदरम्यान मिसिंग लिंकचे काम सुरू आहे. त्याच्या जवळच्या भागातच गेल्या सहा दिवसांत दरड कोसळली. एक दरड कुसगाव येथे, तर दुसरी दरड आडोशी व कामशेत येथे कोसळली. या भागातही रस्त्याच्या कामांसाठी छोट्या प्रमाणात ब्लास्ट केले आहेत.

ब्लास्टिंगमुळे हादरे बसतात. हा एक प्रकारचा कृत्रिम भूकंपच आहे. हादऱ्यामुळे खडकांना भेगा पडतात. नंतर त्या रुंदावतात. त्यात पावसाचे पाणी गेल्यानंतर खडकाचा स्तर ढासळू लागतो. त्याचा परिणाम म्हणून दरडी कोसळतात.

- सतीश ठिगळे, भूगर्भशास्त्रज्ञ, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.