फुरसुंगी - दिवेघाटात गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याचा प्रकार घडला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
घाट परिसरात पडत असलेल्या पावसाने डोंगरावरील झरे चालू असून माती घसरडी झाली आहे. वडकीवरून सासवडच्या दिशेने जाताना तिसऱ्या वळणावर गुरुवारी अचानक दरड कोसळण्याचा प्रकार घडला. सुरक्षा म्हणून डोंगराच्या बाजूने चार खणण्यात आली आहे.