खेड-शिवापूर : कात्रज जुन्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिंदेवाडीच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दरडीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत अथवा नुकसान झाले नाही. मात्र यानिमित्ताने कात्रज जुन्या बोगद्यावरील धोकादायक दरडींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कात्रज जुन्या बोगद्याच्या शिंदेवाडी गावच्या बाजूकडील प्रवेशद्वाराच्या तोंडाशी ही दरड कोसळली. पुण्याच्या दिशेने निघालेला टेम्पो आणि एक दुचाकी या दोन वाहनांच्या मध्यभागी या दरडीचा काही भाग कोसळला. एक टेम्पो आणि एक दुचाकी पुण्याकडे निघाली होती.
हा टेम्पो आणि दुचाकी या दोन वाहनांच्या मध्ये दरडीचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही किंवा नुकसान झाले नाही. रस्त्याच्या एका कडेला दरड कोसळल्याने वाहतुकीला अडथळा झाला नाही. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. मात्र यानिमित्ताने कात्रज जुन्या बोगद्यावरील आणि कात्रज घाटातील दरडींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्यात याठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.