भारतातून सध्या मोठ्या प्रमाणावर गहू निर्यात होत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे.
पुणे - मागील १० दिवसांमध्ये गव्हाचे भाव (Wheat Rate) क्विंटलमागे ३५० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Ukraine War) गव्हाच्या भाववाढीवर परिणाम (Effect) झाला आहे. रशिया जगातील मोठा गहू उत्पादक देश आहे तर युक्रेनचा गहू निर्यातीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. मात्र, युद्धामुळे अनेक देशात गव्हाची होणारी निर्यात (Export) थांबली आहे.
भारतातून सध्या मोठ्या प्रमाणावर गहू निर्यात होत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात वाढ झाली आहे. सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. सर्वसाधारणपणे जेव्हा बाजारात नवे पीक येते, तेव्हा भाव स्वस्त होतात. परंतु, मागणीमुळे गव्हाचे भाव वाढले आहेत. येणाऱ्या काळात गव्हाचे भाव आणखीन वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकरी नवा गहू बाजारात आणताना दिसून येत नसल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी अभय संचेती यांनी सांगितले.
किराणा भुसार विभागामध्ये गव्हाची दररोज साधारणतः २० ट्रक इतकी आवक होते. बाजारात खानदेश, मध्यप्रदेश, गुजरात या भागातून गव्हाची आवक होते. मात्र, यंदा नवीन मालाची आवक कमी आहे. बाजारात जुन्या मालाचा साठा कमी आहे. परंतु सध्या बाजारात गव्हाला मागणी आहे. त्यामुळे भाववाढ झाली आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वांत मोठा गहू उत्पादक देश आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गव्हाची निर्यात वाढून गव्हाचे दर आणखी वाढतील, असे धान्याचे व्यापारी किरण छाजेड आणि जेठमल दादीच यांनी सांगितले.
नवीन हंगाम सुरू झाल्यावर शक्यतो भाव कमी असतात. मागील वर्षी केंद्र सरकारने मिलबर गहू २००० ते २०५० रुपयांनी क्विंटलने खरेदी केला. इतर देशातून मागणी जास्त असल्याने यंदा तोच गहू २४५० ते २५५० रुपयांनी खरेदी करण्यास सुरू केला आहे. ही खरेदी मोठ्या प्रमाणावर आहे. हा सर्व गहू निर्यात करण्यासाठी खरेदी केला जात आहे. चांगल्या दर्जाच्या गव्हाच्या भावात यंदा तेजी राहण्याची शक्यता आहे.
- अभय संचेती, धान्याचे व्यापारी, मार्केट यार्ड
काय आहेत भाववाढीची कारणे
रशिया व युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम
निर्यात मोठ्या प्रमाणावर सुरू
बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त
गुजरात येथून होणारी आवक उशिरा
सर्वांत मोठा गहू उत्पादक देश रशिया
रशिया जगातील मोठा गहू उत्पादक देश आहे तर युक्रेनचा गहू निर्यातीत तिसरा क्रमांक लागतो. मागीलवर्षी रशियाने ३.५ कोटी टन गव्हाची निर्यात केली होती तर युक्रेनने २.४ कोटी टन गहू निर्यात केला होता. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे गव्हासाठी रशिया किंवा युक्रेनवर अवलंबून असलेल्या देशांत गव्हाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे इतर देशातून गव्हाची आयात करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.