Ganesh Chaturthi 2024: दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठणाचा वर्ल्ड रिकॉर्ड; स्त्री शक्तीचा जागर, Video

Ganapati Atharvaśīrṣa at Shreemant Dagdusheth Halwai Ganesh Mandal: हजारो महिलांनी एकाच वेळी अथर्वशीर्ष पठण केलं आहे. गिनीज बुकमध्ये अथर्वशीर्ष पठणाची नोंद झाली आहे. यावर्षी महिलांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं.
Shreemant Dagdusheth Halwai Ganesh Mandal
Shreemant Dagdusheth Halwai Ganesh Mandal
Updated on

Shreemant Dagdusheth Halwai Ganesh Mandal

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. यंदाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण झालं आहे. हजारो महिलांनी एकाच वेळी अथर्वशीर्ष पठण केलं आहे. वर्ल्ड रिकॉर्डमध्ये अथर्वशीर्ष पठनाची नोंद झाली आहे. यावर्षी महिलांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं.

टाळांच्या गजरात महिलांनी मोरया मोरयाचा गजर केलाय. दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर ऋषिपंचमीला बाप्पा समोर हजारो महिला पहाटे सामूहिक अथर्वशीर्ष पठण करत असतात. ती पंरपरा यंदाही कायम राहिली आहे. मोठ्या प्रमाणात महिला याठिकाणी जमा झाल्या होत्या. या संदर्भातील काही व्हिडिओ समोर आले आहेत.

Shreemant Dagdusheth Halwai Ganesh Mandal
Ganpati Rangoli Design 2024: गणरायाच्या स्वागतासाठी घरी काढा 'या' सुंदर रांगोळ्या, अंगण दिसेल शोभून
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.