धायरी - समृद्ध जीवन (Samruddh Jeevan) व महेश मोतेवार (Mahesh Motewar) यांनी संपूर्ण भारतात जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भातील (Financial Scam) आणखी महत्वाची कागदपत्रे (Document) राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) (CID) विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सलग एका महिन्यामध्ये १जुलै रोजी नऱ्हे येथील समृद्धी अपार्टमेंट येथे छापा मारण्यात आला होता. त्यावेळी देखील सबळ पुरावे मिळेलेले होते. (Large Stock of Important Documents of Samruddh Jeevan Seized Crime)
१४ जुलै पासून धायरी येथील टामरिन्डपार्क येथे छापा टाकून अंदाजे सातशे ते आठशे गोणी मधून महत्त्वाचे कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच संबंधित सदनिका सील करण्यात आली आहे. धायरी येथील एक सदनिका भरून कागदपत्रे "सीआयडी'ला मिळाली असून या कागदपत्रांचा पंचनामा करण्यासाठी तपास पथकास तीन दिवस लागले आहे.
शेतीला पुरक कर्ज, समृद्धी जीवन फूड्स, तसेच समृद्ध जीवन मल्टि स्टेट को ओपरेटीव्ह इतर व्यावसाय व शेळीपालन व अन्य व्यावसायाची जोड देत त्यातुन मोठा आर्थिक फायदा मिळण्याचे आमिष दाखवून महेश मोतेवार व त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील शेतकरी व गुंतवणुकदारांची फसणूक केली होती. याप्रकरणी समृद्ध जीवनच्या महेश मोतेवारविरुद्धा २२ राज्यात २८गुन्हे दाखल आहेत. राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या या घोटाळ्याचा तपास काही वर्षांपुर्वी सीआयडी'कडे आला. काही दिवसांपुर्वीच मोतेवारने श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टच्या मुर्तीला अर्पण केलेला 60 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार "सीआयडी'ने जप्त केला होता.
'सीआयडी'च्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिक्षक संदिप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक मनीषा धामणे पाटील यांच्याकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्यानुसार, एक जुलै रोजी धामणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नऱ्हे येथील समृद्ध जीवन पार्क येथे छापा टाकून समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणातील दुसरीकडे हलविण्यात येणारी महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. तेथे पोलिसांना एक दुकान व दोन सदनिका भरुन ठेवलेली कागदपत्रे आढळली होती. समृद्ध जीवन घोटाळाप्रकरणी धायरी येथेही कागदपत्रांचा मोठा साठा असल्याचे धामणे पाटील यांना समजले. त्यानंतर त्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथे सदनिका भरून कागदपत्रे आढळली. दोन दिवसभर कागदपत्रांचा पंचनामा सुरू करण्याचे काम पथकाकडून सुरू होते.
समृद्ध जीवन आर्थिक घोटाळा प्रकरणासंबंधित मागील तीन दिवसांपासून धायरी येथील एका आलिशान सोसायटी मध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र मिळाले असून आम्ही या कागदपत्रांचे पडताळणी करीत आहोत. या मध्ये अनेक पुरावे हाती लागले असून जवळपास आमचे वीस पोलीस अंमलदार यासाठी तीन दिवस काम करत आहेत.
- मनीषा धामणे पाटील, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.