अन् तुटता तुटता वाचले 105 जोडप्यांचे संसार फक्त यामुळे...

Last year 44 percent of claims were settled through mediation In Family Court in Pune.jpg
Last year 44 percent of claims were settled through mediation In Family Court in Pune.jpg
Updated on

पुणे : येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या विविध प्रकारच्या वैवाहिक स्वरूपाच्या दाव्यांमध्ये 44 टक्के प्रकरणे गेल्या वर्षभरात मध्यस्थीद्वारे निकाली काढण्यात यश आले आहे. गेल्यावर्षी 239 दावे मध्यस्थीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 105 दावे मध्यस्थीतीतून मिटविण्यात आले.

शेतकऱ्यांनो, आधार नोंदणी करुन घ्या कारण...
 

जोडप्यातील वाद विकोपाला जाऊ नये व त्यांच्या नात्यातील गोडवा कायम राहावा म्हणून कौटुंबिक न्यायालयात दाखल होणारे दावे मध्यस्थीद्वारे निकाली काढण्यासाठी मध्यस्थी केंद्र (मीडीएशन सेंटर) कार्यरत आहे. त्यात दावा दाखल करणारे आणि ज्यांच्या विरोधात दावा आहे त्यांचे प्रश्‍न समजावून घेतले जातात. मध्यस्थी करून संबंधितांमध्ये झालेल्या वादाचे निराकरण करण्याचा प्रयत्न होतो. मध्यस्थी करण्यात न्यायाधीश, मीडीएशनचे प्रशिक्षण देण्यात आलेले न्यायाधीश, माजी न्यायाधीश, वकील, माजी समुपदेशक यांचा समावेश असतो. सध्या 33 मध्यस्थी न्यायालयात कार्यरत असून त्यात नऊ आजी-माजी न्यायाधीश आहेत.

पुण्यात जिल्ह्याधिकाऱ्यांनी मारली सायकलवरुन फेरी कारण....

केंद्राचे समन्वयक म्हणून न्यायाधीश सुभाष काफरे कामकाज पाहत आहेत. वाद न मिटल्यास कुटुंबावर काय परिमाण होऊ शकतो, याची जाणीव संबंधितांना करून दिली जाते. त्यामुळे दावे मागे घेतले जातात. न्यायालयात सध्या पाच हजाराहून अधिक दाव्यांची सुनावणी सुरू आहे. वैवाहिक स्वरूपाच्या दाव्यांमध्ये पक्षकारांनी आपल्या दाव्यांमधील वादांचे निराकरण करण्यासाठी मध्यस्थी या प्रक्रियेचा जास्त लाभ द्यावा, असे आवाहन मध्यस्थी केंद्राचे समन्वयक म्हणून न्यायाधीश सुभाष काफरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.