गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी दगडूशेठला साकडे, महाआरतीचं आयोजन

मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी दगडूशेठला साकडे, महाआरतीचं आयोजन
Updated on

पुणे : स्वर सम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या प्रकृती पुर्ण बरी व्हावी म्हणून डॉ.नीलमताई गो-हे व नवनियुक्त शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी यांनी दगडूशेठ गणपतीची (Dagdusheth Ganpati) महाआरती केली आहे. दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलंय त्या ज्येष्ठ सिने गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची (Corona) बाधा झाली आहे. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली आहे. त्यामुळे त्यांची तब्येत अस्थिर असून त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी दगडूशेठला साकडे, महाआरतीचं आयोजन
कोहलीला किंग ठरवणाऱ्या आठवणीतल्या 10 गोष्टी

त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे, शिवसेना महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांनी शिवसेना पुणे शहराच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली. या प्रसंगी डॉ.गो-हे यांनी भारत रत्न लताताई मंगेशकर यांचे स्थान सर्व भारतीयांच्या आणि सर्वांच्या हृदयात असून त्यांची श्रद्धा, आणि माणुसकी, त्यांची कामावरची निष्ठा तसेच हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दलचा त्यांचा अकृत्रिम स्नेह लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी दगडूशेठला साकडे, महाआरतीचं आयोजन
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणी; आयुर्वेदिक महत्त्व

तसेच या कार्यक्रमाची कल्पना मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे व रश्मीताई ठाकरे यांना असल्याचे संगितले. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजेंद्र शिंदे, निर्मला केंडे, स्वाती ढमाले, अमृता पठारे, सुदर्शना त्रिगुणाईत, सुलभा तळेकर, अश्विनी शिंदे, विद्या होडे, राहुल जेकटे, अनीता परदेशी, वैशाली दारवटकर, अरुणा पवार, स्मृति नाझरकर, मकरंद पेठकर, स्वाती कथलकर शिवा जगधणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.