Corona Update : पुणेकरांनो काळजी घ्या! ‘जेएन.१’चा संसर्ग वाढतोय; राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात

कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटचा ‘जेएन.१’ हा उपप्रकार आहे. त्याने ‘एक्सबीबी’या व्हेरियंटची जागा घेतली आहे. त्यामुळे हा नवीन व्हेरियंट राज्यात सर्वत्र पसरत असल्याचे दिसत आहे.
Latest Corona Update highest number of 150 patients of  JN.1 Corona Variant in Pune district
Latest Corona Update highest number of 150 patients of JN.1 Corona Variant in Pune district
Updated on

पुणे : पुणेकरांनो, कोरोनाच्या ‘जेएन.१’ या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, प्रतिबंधात्मक काळजी मात्र नक्की घ्या. गर्दीमध्ये जाऊ नका, मास्कचा वापर करा आणि सामाजिक अंतराचे भान राखा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

कोरोनाच्या ओमिक्रॉन या व्हेरियंटचा ‘जेएन.१’ हा उपप्रकार आहे. त्याने ‘एक्सबीबी’या व्हेरियंटची जागा घेतली आहे. त्यामुळे हा नवीन व्हेरियंट राज्यात सर्वत्र पसरत असल्याचे दिसते. मात्र, हा व्हेरियंट सौम्य आहे. त्याच्या संसर्गातून रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली तरीही रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे.

राज्यात ‘जेएन.१’ विषाणूचे २५० रुग्णांचे निदान झाले. यापैकी सर्वाधिक १५० रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहे, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात केलेल्या जनुकीय क्रमनिर्धाणातून हा निष्कर्ष निघाला आहे, असे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’चे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

Latest Corona Update highest number of 150 patients of  JN.1 Corona Variant in Pune district
PM Modi Kalaram Mandir Video : मोदींनी केली काळाराम मंदिराची साफसफाई, समस्त देशवासीयांना केला 'हा' आग्रह...

डॉ. कार्यकर्ते म्हणाले, ‘‘या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या जनुकीय क्रमनिर्धारणात ‘जेएन.१’चा संसर्ग वाढल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्यक्ष रुग्णामध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहे.’’

Latest Corona Update highest number of 150 patients of  JN.1 Corona Variant in Pune district
Nari Shakti Doot App : PM मोदींनी लाँच केलं 'नारी शक्ती दूत अ‍ॅप'; याचा महिलांना कसा होणार फायदा? जाणून घ्या

जेएन.१ चे सर्वाधिक रुग्ण

जिल्हा रुग्ण

पुणे १५०

नागपूर ३०

मुंबई २२

सोलापूर ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.