आरोपी रविंद्र बऱ्हाटेला आश्रय देणाऱ्या वकीलास अटक

रविंद्र बऱ्हाटे हा फरारी असताना त्यास आपल्या आळंदी येथील घरात आश्रय देणाऱ्या वकीलास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक
Crime
CrimeSakal
Updated on

पुणे - महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) (Mokka) कारवाई (Crime) झालेला माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बऱ्हाटेला (Ravindra Barhate) हा फरारी असताना त्यास आपल्या आळंदी येथील घरात आश्रय देणाऱ्या वकीलास (Lawyer) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक (Arrest) केली. संबंधीत वकील हा भाजपचा महाराष्ट्र प्रदेश लिगल सेलचा पदाधिकारी असून तो मागील वर्षभरापासून पोलिसांना (Police) गुंगारा देत होता. न्यायालयाने त्यास 1 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ऍड.सागर संजय म्हस्के (वय 32, रा. म्हस्के वस्ती, कळस, आळंदी रोड) असे अटक केलेल्या वकीलाचे नाव आहे. बऱ्हाटे हा "मोका'तील फरारी आरोपी आहे, हे माहिती असूनही त्यास आश्रय दिल्याप्रकरणी ऍड.म्हस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध एका हॉटेल व्यावसायिकास कट रचून खंडणी उकळणे, धमकाविणे, सावकारी कायदा, हत्यार बाळगणे तसेच अनुसूचित जाती-जामती प्रतिबंधक कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी) हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Crime
भारताला सुपरपावर बनवण्यासाठी DRDO कार्यरत - राजनाथ सिंह

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षाभरापासून बऱ्हाटे हा पोलिसांना गुंगारा देत होता. तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करून पोलिसांना देखील वेठीस धरत होता. त्यास पुणे पोलिसांनी मागील महिन्यात अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्यास कळस येथे राहणाऱ्या ऍड. सागर म्हस्के याने आश्रय दिल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी बऱ्हाटे हा तिथे शांताराम पाटील अशी नाव सांगत खरी ओळख लपवून राहात होता. तेथेच त्याने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राकरीता देणगी दिल्याचेही तपासात समोर आले होते. बऱ्हाटेच्या अटकेनंतर त्यास आश्रय देणारा ऍड.म्हस्के हा देखील फरारी झाला होता. गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती. याच दरम्यान तो देवदर्शनासाठी फिरत असल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत माहिती पुढे आली होती. दरम्यान म्हस्के हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास गुरूवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अटक केली.

ऍड.म्हस्के पुर्वी राष्ट्रवादीत, आता भाजपात

ऍड.सागर म्हस्के हा साडे तीन वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये काम करीत होता. त्यानंतर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या तो भाजपच्या लीगल सेलचा (कायदा आघाडी) पदाधिकारी म्हणून कार्यरत होता.

Crime
Army Recruitment Case : प्रकरण स्वतःकडे घेण्यास लष्कराची असमर्थता

असा आहे हडपसर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा

मांजरी भागात राहणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाने फायनान्स कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी बऱ्हाटेकडून बेकायदा सावकारी करून 25 लाख रुपये जादा व्याजदराने कर्ज घेतले होते. त्यानंतर व्यावसायिकाने त्यांना सव्वा अकरा लाख रुपये परत केले होते. तर आरोपींनी निवडणुकीच्या काळात त्यांच्या हॉटेलवर जेवण करून चार ते पाच लाख रुपयांचे बील केले होते. तरीही उर्वरीत रक्कम परत घेण्यासाठी तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांचा मांजरी येथील बंगला स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्यांच्या पत्नी व मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर बनावट कागदपत्रे बनवून आरोपींनी बंगला बळकावण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व प्रकाराला कंटाळून व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर बऱ्हाटे, विशाल ढोरे व त्यांच्या 12 साथीदारांकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.