Political Leader Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. यादरम्यान अनेक वेळा मराठा-ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे प्रकार घडले आहेत. यादरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यसेवन केल्याचा आरोप करत त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार कात्रज-कोंढवा परिसरात सोमवारी रात्री घडला. लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन वाद घातल्याचा दावा मराठा तरुणांनी केला आहे, या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
रात्री मराठा तरुणांना हाके यांना जाब विचारत त्यांना कोंढवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. येथे मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत हाके यांच्या वैद्यकीय चाचणीची मागणी केली. यानंतर हाके यांची वैद्यकिय चाचणी करण्यात आली आहे.
मराठा कार्यकर्त्यांच्या मगणीनंतर लक्ष्मण हाके यांची ससुन रुग्णालयात वैद्यकिय चाचणी केली. या चाचणीच्या प्राथमिक अहवालात त्यांनी दारु पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. आ चाचणीचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात. त्यानंतर हाके यांनी मद्य घेतले होते की नाही ते कळणार आहे.
दरम्यान रात्रीच्या या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून २० ते २५ मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . दरम्यान हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
लक्ष्मण हाके हे पुण्यातील कात्रज-कोंढवा रोड परिसरात असताना काही मराठा सामाजातील तरुणांसोबत त्यांचा वाद झाला. माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्याबाबत हाके यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानावर हे तरुण त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत होते. पण यावेळी हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोपही या तरुणांनी केला आहे.
यातून त्यांच्यामध्ये वाद वाढत गेल्यानं हाके आणि मराठा तरुण हे कोंढवा पोलीस ठाण्यात पोहोचले. याठिकाणी मराठा तरुणांनी हाके यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. यासंपूर्ण घटनेचा आणि पोलीस ठाण्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.