कात्रज - भारतीय टपाल सेवेत ४० वर्षे नोकरी केलेल्या लक्ष्मण रामचंद्र लोणकर यांनी विविध देशातील जुन्या काळापासूनची नाणी जमा करण्याचा छंद जोपासला आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात त्याप्रममाणे कोणाला काय छंद असेल सांगता येत नाही. याप्रमाणे त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षापासून ते आजपर्यंत म्हणजे ते ७८ व्या वर्षांपर्यंत त्यांनी विविध नाणी जमा केली आहेत.
नोकरीच्या काळात त्यांना चार वर्षे भारतीय सैन्याच्या टपाल कार्यालयात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या नोकरीचाही नाणे जमा करण्याच्या छंदासाठी फायदा झाला. लोणकर यांचा विविध देशाच्या नाण्यांसह नाण्यांचे लिलाव, विविध देशात छापली गेलेली नाणी, आपल्या देशात पुरातन काळापासून बदलत गेलेली नाणी, बदलत गेलेले चलन अशा विषयावर अभ्यास आहे. नाण्यांचे अल्बम करून त्यांनी हा संग्रह केलेला आहे. एक पैशापासून ते एक आण्यापर्यंत आपल्या देशातील सर्व जुनी नाणी यामध्ये उपलब्ध आहेत.
माझा मुलगा अनेकवेळा कंपनीच्या कामानिमित्त परदेशात जात असतो. माझा छंद त्याला माहीत असून त्यामुळे अनेकवेळा तो अशी नाणी माझ्यासाठी घेऊन येतो. नोकरीत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्या छंदाविषयी माहिती असायची. म्हणून तेही माझ्यासाठी विविध देशातून नाणे घेऊन येत असत. त्यातून नाणे जमा करण्यास मोठी मदत झाली.
आता जवळपास १८०० ते २००० नाण्यांचा संग्रह झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुघल साम्राज्य, हिंदवी साम्राज्य, मराठा साम्राज्य, स्वातंत्र्यपूर्व भारत आणि स्वतंत्र भारतातील नाण्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर, वेवगेगळ्या देशांची नाणी आहेत.
यामध्ये प्रामुख्याने जर्मनी, जपान, हाँगकाँग, अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका अशा देशांसह जवळपास विविध १०० देशांचा समावेश आहे. उपलब्ध नाण्यांमध्ये सोने किंवा चांदीचे कुठलेही नाणे नाही. सर्व तांबे पितळ, अल्युमिनियम, निकेल, स्टील अशा धातूची नाणी असल्याचे लोणकर सांगतात.
शिवकालीन नाण्याला खूप महत्व आहे. त्याच्यासोबत मराठी माणसांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. परंतु, अलीकडील काळात नव्याने नाणे छापण्याचे काम सुरू आहे. त्याला सोन्याच्या किंवा चांदीच्या धातूमध्ये बनवून पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत शिवकालीन नाणे असल्याचे सांगून विकण्यात येते.
या माध्यमांतून लोकांचे शिवकालीन नाण्यांसोबत असलेल्या श्रद्धेच्या नात्याचा गैरफायदा घेण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू आहे. यातून लोकांनी काळजी घ्यायला हवी आणि आपली फसवणूक होण्यापासून थांबवावे, असेही लोणकर आवर्जून सांगतात.
प्रतिक्रिया
हा केवळ माझा छंद आहे. मला यातून खूप मोठे आत्मिक समधन मिळते. त्यामुळे मी ही नाणी जमा करण्यास सुरुवात केली. मागील चाळीस ते पन्नास वर्षात ही नाणी जमा झाली आहेत. तसे पाहायला गेले तर या नाण्यांची किंमत आजच्या बाजारमुल्यानूसार काहीच नाही.
- लक्ष्मण रामचंद्र लोणकर, सेवानिवृत्त, पोस्ट कर्मचारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.