एलईडी, वॉशिंग मशिन, आधुनिक फ्रिजला पसंती

दीपावलीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेत मोठ्या आकाराचे स्मार्ट फोर-के एलईडी टीव्ही, ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन, जास्त स्पेस असणाऱ्या डबल डोअर आणि साइड बाय साइड फ्रिजला बाजारात मागणी वाढली आहे.
एलईडी, वॉशिंग मशिन, आधुनिक फ्रिजला पसंती
Updated on

स्वारगेट - दीपावलीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारपेठेत मोठ्या आकाराचे स्मार्ट फोर-के एलईडी टीव्ही, ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन, जास्त स्पेस असणाऱ्या डबल डोअर आणि साइड बाय साइड फ्रिजला बाजारात मागणी वाढली आहे, तसेच डिश वॉशर, हॅन्डमिक्सर, स्मार्ट पंखे यांनाही ग्राहकांनी खरेदी करण्यास पसंती दिल्याचे इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

स्मार्ट एलईडीला बाजारात मोठी मागणी असल्याचे कारण सांगताना व्यावसायिक आदित्य मालू म्हणाले, ‘‘लेटेस्ट टेक्नॉलॉजी, स्क्रीनवर दिसणारे हाय क्वालिटीचे चित्र, चांगली साउंड सिस्टिम, ओएलईडीने गूगल टीव्हीचा केलेला पुरेपूर उपयोग यामुळे ग्राहकांची या टीव्हीसाठी पसंती आहे. यामध्ये ४३ व ५५ इंच टीव्हीला ग्राहकांची पसंती आहे. सेमी ऑटोमॅटिकऐवजी ग्राहक आता फुल्ल ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनच घेत आहेत. बाय बॅक योजनेलाही ग्राहकांची पसंती आहे.’

सिंगल डोअर फ्रिज बदलून डबल डोअर फ्रिज घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्याचबरोबर बाजारात अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेले आणि रिमोटवर वापरता येतील अशा स्मार्ट फॅनलाही ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. घरगुती कामासाठी कामगार मिळत नसल्याने डिश वॉशरला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्याला गरम पाण्याचे कनेक्शनही जोडता येते.

वस्तूंच्या किमती

  • फ्रिज १४,००० +

  • स्मार्ट टीव्ही १५,००० +

  • डिश वॉशर २६,००० +

  • एसी ३०,००० +

  • वॉशिंग मशिन १६,००० +

  • मिक्सर ३,५०० +

एलईडी, वॉशिंग मशिन, आधुनिक फ्रिजला पसंती
पुणे : अखेर बिबट्या भरवस्तीत दिसला, पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल

दिवाळीमुळे एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीजला मागणी जास्त आहे. ४३, ५५, ६५ इंची टीव्हीला मागणी आहे.

- साकेत खंडेलवाल, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक

स्मार्ट फॅनला ग्राहकांची पसंती दिसून येते. यामध्ये ६५ टक्के वीज वाचते. रिमोटवर फॅनला तुम्ही कंट्रोल करू शकता. वजनाने हलक्या असणाऱ्या या फॅनचा आवाज येत नाही. यात एलईडी बल्बचीही सोय आहे.

- अरुण जैन, इलेक्ट्रिक व्यावसायिक

मोठ्या फ्रीजची मागणी वाढली आहे. कारण स्टोरेजचे प्रमाण वाढले आहे. एलईडी फोर-के आणि पुढचे व्हर्जन एट-के ला सुद्धा मागणी वाढत आहे.

- अमित शहा, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक

गेल्या तीन महिन्यांत टॅब, लॅपटॉपला मागणी होती. आता या महिन्यात एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशिनला मागणी वाढली आहे.

- ज्योती मित्रा, ऑपरेशन मॅनेजर - कंपनी

आजकाल घरात प्रत्येकाला स्वतंत्र रूममध्ये टीव्ही हवा असतो. लोकांना मोठ्या स्क्रीनचे टीव्ही पाहायला आवडतात. हॉलनुसार मोठा टीव्ही लागतो. त्यात टीव्हीला म्युझिक सिस्टिम असल्यामुळे थिएटरसारखा अनुभव येतो.

- अमोल बाबर, ग्राहक

झिरो डाउन पेमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात. तसेच बँकांनी परतफेड करण्याचा वेळ वाढवला असल्याने खरेदी करताना पैशाची अडचण येत नाही.

- देवा देवकुळे, ग्राहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.