मंचर - आंबेगाव तालुक्यातील सहा प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील गरीब व गरजू कुटुंबातील १४० सावित्रीच्या लेकींना सायकल वाटपाचा कार्यक्रम लीला पूनावाला फाऊंडेशन व cfti, Atlas copco समूहाच्यावतीने करण्यात आला. सायकल भेटल्यानंतर विद्यार्थिनी भारावून गेल्या. त्यांचे चेहरे आनंदाने फुलले.
खडकी-पिंपळगाव (ता.आंबेगाव) येथे काळभैरवनाथ सौ. लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी (ता. १६) सायकल वाटप कार्यक्रम Atlas copco कंपनीचे उपाध्यक्ष मार्सेलो काबिलियो, सेन्ट्रल फोर ट्रान्सफोर्मिंग इंडिया कंपनीचे विश्वस्त सिद्धेश बागवे, मुख्य कार्यकारी अधिकारी विभूती पंड्या यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अमरदीप सिसोदिया,अभिजीत पाटील, जयवंत आहेर, सुमेध खैरे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, सरपंच नारायण बांगर, कृष्णा भोर, दीपक बांगर, अशोक भोर, पोपट वाघमारे, दत्तात्रय बांगर, संगीता जगताप, मुख्याध्यापक सुनिल वळसे पाटील उपस्थित होते. सायकलची प्रत्येकी किंमत सात हजार रुपये आहे.
'हिरकणी विद्यालय गावडेवाडी, महात्मा गांधी विद्यालय मंचर, श्रीराम विद्यालय पिंपळगाव, काळभैरवनाथ सौ. लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालय खडकी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली खुर्द व चांडोली बुर्दुक या शाळेतील दूरवरून पायी येणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींची निवड सायकली मिळण्यासाठी केली आहे.' अशी माहिती लीला पूनावाला फाऊंडेशनच्या शाळा प्रकल्प अधिकारी भारती नाईक यांनी दिली.
'सायकल मिळालेली प्रत्येक विद्यार्थिनी घराच्या परिसरात एका वृक्षाची लागवड करून फोटो विद्यालयाकडे पाठविणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषण मुक्त परिसर होण्यासाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या सहकार्याने सदर उपक्रम हाती घेतला आहे.' असे भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी सांगितले. c.f.t.i कंपनीचे मुख्य अधिकारी अमित देशपांडे यांनी आभार मानले.
'आंबेगाव तालुक्यात सहा शाळेतील ५६० विद्यार्थीनींना लीला पूनावाला फाऊंडेशनने दत्तक घेतले आहे. या विद्यार्थींनीचा इयत्ता सातवी ते पदवीपर्यंतचा पूर्ण खर्च फाऊंडेशनतर्फे केला जातो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्त्री शिक्षणाचा वारसा फाऊंडेशन समर्थपणे चालवत आहे.'
- सुनिल वळसे पाटील, मुख्याध्यापक काळभैरवनाथ सौ.लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.