पुणे : अखेर बिबट्या भरवस्तीत दिसला, पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल

पुणे : अखेर बिबट्या भरवस्तीत दिसला, पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल
पुणे : अखेर बिबट्या भरवस्तीत दिसला, पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखलsakal
Updated on

हडपसर : येथील गोसावीवस्ती, गावदेवी मंदिर परिसरात पाहटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणऱ्या व्यक्तीवर हल्ला करणारा बिबट्या आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तेथूनच शंभर मीटरवर भर वस्तीतील दोन घरांच्या बोळीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. कात्रजची रेस्क्यू टीम नऊ वाजता याठिकाणी येऊन बिबट्याला पकडण्यासाठी तयारी करीत आहे.

पुणे : अखेर बिबट्या भरवस्तीत दिसला, पकडण्यासाठी रेस्क्यू टीम दाखल
एनसीबीनं प्रभाकर साईलला बजावलं समन्स, गुरुवारी होणार चौकशी

वस्तीतील सचिन आटोळे व विश्वास गायकवाड या दोघांच्या घरामधील बोळीत बिबट्या बसलेला आढळला. गनच्या साह्याने भूलीचे इंजेक्शन देण्यात आले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू टीम व पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी चोहोबाजूंनी जाळी लावण्याचे काम करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.