Pune: बिबट्यांचा हैदोस सुरूच; मेंढपाळाच्या पालात घूसून महिलेवर हल्ला,सुदैवाने बाळ सुखरूप

Latets Pune News: बिबट्याने पालात झोपलेल्या मिराबाई बरकडे यांच्यावर हल्ला करून उजव्या हाताला चावा घेऊन ओढण्याचा प्रयत्न केला.
Pune: बिबट्यांचा हैदोस सुरूच; मेंढपाळाच्या पालात घूसून महिलेवर हल्ला,सुदैवाने बाळ सुखरूप
Updated on

Pune News: जुन्नर येथील वाघदरातील कुडाचे माळ परीसरात सोमवारी पहाटे बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावरील पालात घुसून महिलेवर हल्ला करून तीला जखमी केले.

यावेळी या मेंढपाळाच्या पाला मध्ये सदर महिलेची दोन मुले व सुन आणि आठ महिन्याचा नातू ही पालात झोपले होते.सुदैवाने मोठी दुर्घटनाच टळली असल्याची भावना स्थानिक नागरीक व्यक्त करत असून मेंढपाळाच्या कुत्र्यानी गोंगाट केल्याने बिबट्या पळून लावले आहे.

Pune: बिबट्यांचा हैदोस सुरूच; मेंढपाळाच्या पालात घूसून महिलेवर हल्ला,सुदैवाने बाळ सुखरूप
Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने

मिराबाई बरू बरकडे वय.४४ असे बिबट हल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून सोमवारी पहाटे चार वाजे दरम्यान बिबट्याने हल्ला केला. बिबट हल्या नंतर जखमी महिलेला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचरासाठी पहाटे अणले असता येथील डॉ.श्रीहरी सारोक्ते यांनी तिच्यावर उपचार करून वनविभागाला सदर घटनेची माहीती दिली.त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचार्याच्या पथकाने सदर महिलेला पुढिल उपचारासाठी नारायणगाव येथे नेले.

या बिबट हल्ल्याबाबत स्थानिक नागरीकांकडून मिळालेली माहिती अशी की सदर मेंढपाळांने ओतूर मधील वाघदरा येथील कुडाचे माळ येथे आबांदास डुंबरे यांच्या शेतात रात्रीचा मुक्कामी मेंढ्याचा वाडा ठेवला होता.एकूण १५० मेंढ्याच्या वाड्यात पाल ठोकूण मेंढपाळ कुटूंब झोपले होते.सोमवारी पहाटे चार वाजेदरम्यान बिबट्याने पालात झोपलेल्या मिराबाई बरकडे यांच्यावर हल्ला करून उजव्या हाताला चावा घेऊन ओढण्याचा प्रयत्न केला.

Pune: बिबट्यांचा हैदोस सुरूच; मेंढपाळाच्या पालात घूसून महिलेवर हल्ला,सुदैवाने बाळ सुखरूप
काय सांगता? लॉकडाऊनमध्ये पुण्यात होतेय हुक्क्याचीही 'होम डिलीव्हरी'

मात्र मेंढ्या बरोबर असलेल्या कुत्र्यानी मोठ्या आक्रमक पणे भुकून बिबट्याला पळवून लावले.कुत्र्याच्या गोगाटामुळे मिराबाई यांचे दोन्ही मुले अमोल बरकडे व राहूल बरकडे आणि सुन व आठ महिन्याचा नातू सर्व जागे झाले.मुलानी अभिषेक गाढवे यांना फोन करून बिबट्या हल्ला केल्याची माहिती दिल्यावर अभिषेक त्याना ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

सदर परीसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी संतोष डुंबरे,अभिषेक गाढवे,नारायण डुंबरे,दिपक डुंबरे,भरत डुंबरे,हरिभऊ डुंबरे,मिलिंद डुंबरे,संतोष खंडागळे,महादू खंडागळे,तुळशीराम खंडागळे यांनी केली आहे.

Pune: बिबट्यांचा हैदोस सुरूच; मेंढपाळाच्या पालात घूसून महिलेवर हल्ला,सुदैवाने बाळ सुखरूप
Pune News : डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला मेघडंबरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.