निरगुडसर - आठ दिवस वनविभागाच्या पिंजाऱ्याला गुंगारा देणारा बिबट्या अखेर सोमवारी पहाटे पिंजऱ्यात अडकला, वळती (ता.आंबेगाव) येथील बिघे मळ्यात वनविभागाने आठ दिवसापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आले असले तरी या भागात अजून दोन ते तीन बिबट्याचा वावर असल्याने पुन्हा या परिसरात पिंजरा लावण्यात येणार आहे.