Pune News : पिंपळवंडी येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

पिंपळवंडी येथील एक तरुणी शेतात काम करत असताना गंभीर जखमी
leopard caught in trap as forest department set in the farm at pimpalwandi
leopard caught in trap as forest department set in the farm at pimpalwandiSakal
Updated on

पिंपळवंडी : येथील वामन पट्टयातील(ता.जुन्नर) शेतकरी दत्तात्रय वामन यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एक सुमारे सहा वर्षे वयाची मादी बिबट्या जेरबंद झाली असल्याची माहिती ओतुर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

सदर बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात वनपाल संतोष साळुंखे,वनसहायक रोशन नवले,बाबाजी खर्गे यांनी हलविले. काळवाडी येथील आठ वर्षीय मुलगा खेळत असताना ,पिंपरी पेंढार येथील महिला बाजरीच्या पिकाची राखण करताना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले होते.

तसेच पिंपळवंडी येथील एक तरुणी शेतात काम करत असताना गंभीर जखमी झालेली होती.या घटने नंतर वनविभागाने या परिसरात ३० पिंजरे लावलेले होते. काळवाडी,पिंपळवंडी व पिंपरी पेंढार या गावात मागील आठ दिवसात एकुण सहा बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले आहे.

सहा बिबटे जेरबंद झाल्यानंतर देखील नागरिकांना बिबट्यांचे दर्शन वेगवेगळ्या भागात होत असल्याने ते भयभित झालेले आहेत.हल्ल्याच्या सर्व घटना या सकाळी तसेच सायंकाळच्या वेळेस झाल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभाग करत आहे.तसेच मानव बिबट सहजीवन या संदर्भात वनविभाग गावांतील वाडी वस्तीवर जाऊन बिबट्यापासून बचावासाठी जनजागृती करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.