पुणे : वाहनाने दिली धडक अन् बिबट्या झाला ठार...

पुणे : वाहनाने दिली धडक अन् बिबट्या झाला ठार...
Updated on

महाळुंगे पडवळ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता.आंबेगाव) येथील सहाणेमळ्यानजीक शनिवारी (ता.१३) रात्री साडेआठ वाजता रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

उसाची तोड झाल्याने बिबट्यांचे लपणे नष्ट झाल्याने बिबटे भक्ष्याच्या शोधात इतरत्र फिरत असताना कळंब परिसरातील सहानेमळा, वर्पेमळा व शिरामळा परिसरातील शेतकऱ्यांना दर्शन दिले आहे. येथे कुत्री, शेळ्या, मेंढ्या, घोडी, वासरे आदी पशूंवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. गेल्या एक महिन्यापासून या भागात बिबट्याच्या मादीचा वावर आहे. अनेक ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यांना बिबट्या हुलकावणी देत होता. परंतु शनिवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली, असे सरपंच राजश्री भालेराव व उपसरपंच डॉ.सचिन भालेराव यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अरुण भालेराव यांना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सदर घटनेची माहिती त्यांनी वनविभागाला कळविली. वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनपाल नारायण आरुडे, बी. एम. साबळे, एस. एस. बईचे, वनरक्षक कैलास दाभाडे, कल्पना पांढरे, बी. जी. भालेराव यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्याला ताब्यात घेतले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पेठ-अवसरी घाट येथे पंचनामा करण्यात आला. कळंबचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.शरद निघोट यांनी शवविच्छेदन केले आहे. अवसरी-पेठ घाट येथे बिबट्याचे अग्नी दहन करण्यात आले. 

सदर बिबट्या मादी जातीचा असून, एक वर्ष वयाचा होता. पायाला व छातीला मार लागल्याने बिबट्या जागीच गतप्राण झाला आहे, अशी माहिती वनपाल नारायण आरुडे यांनी दिली.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.