Pune : वाडा-मोसेवाडी परिसरात बिबट्याचा वावर

बछडा आढळल्यामुळे खात्री; वन विभागाकडून नागरिकांना सुरक्षेबाबतच्या सूचना
Leopard
Leopardsakal
Updated on

चास : वाडा-मोसेवाडी (ता. खेड) येथे मानवी वस्तीत बिबट्याचा बछडा आढळून आला. त्यामुळे परिसरात बिबट्याचा (leopard) वावर असल्याची खात्री झाली आहे. खेड (khed) तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यातील वाडा गावची मोसेवाडी हि डोंगराच्या पायथ्याशी असलेली आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची नागरिकांनी माहिती दिली आहे. (leopard roaming wada mosewadi area)

या परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी उतारावर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास संजय मोसे यांना त्यांच्या घराच्या पाठीमागे कोणतेतरी पिल्लू ओरडताना आढळून आले. त्यांनी जवळ जाऊन खात्री केली असता ते बिबट्याचे असल्याची खात्री झाली. त्यांनी गावातील नागरिकांसह वनविभागाला याची माहिती दिली. या परिसरात अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत होते. पण, त्यास पुष्टी मिळत नव्हती. मात्र, सोमवारी येथे बिबट्याचा बछडाच सापडला. त्यामुळे येथील परिसरात बिबट्या व बिबट्याची मादी असल्याची खात्री झाली आहे.

संजय मोसे, गजानन सुरकुले, किशोर सुपे, रमेश उगले, अशोक सुपे, संदीप सुरकुले यांनी या बछड्याला सुरक्षीत ठिकाणी ठेवले. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कासारे, संदीप राठोड, ए. आर. गुट्टे, एम. बी. शेळके, ए. जे. कंधारकर, ए. बी. नायकवाडे, वनपाल गिरीश कुलकर्णी, ए. एम. पारधी यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले.

Leopard
भावाला अकादमीत पोहोचवण्यासाठी घरातून निघाला, वाटेत मृत्यूने गाठले

बछडा तीन महिन्यांचा असून, वरिष्ठ अधिकारी व माणिकडोह येथील पशुवैद्यकीय डॅाक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सदर बछड्यास त्यांच्या आईच्या कुशीत सोडणे कामी सापडलेल्या परिसरात सोमवारी रात्री ठेवले होते. पण, सकाळी हा बछडा जागेवरच आढळून आला. त्यामुळे मंगळवारी रात्रीही बछडा तेथे ठेवण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कासारे यांनी सांगितले. परिसरामध्ये बिबट-मानव संघर्षाबाबत जनजागृती केली असून, ग्रामस्थांना सुरक्षेबाबत सूचना देण्याबरोबरच नागरिकांची जनजागृती करून रात्री रेस्क्यू टीम गस्त घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.