इंदापुर, करमाळा सिमा भागात बिबट्याचा धोका 

इंदापुर, करमाळा सिमा भागात बिबट्याचा धोका 
Updated on

भिगवण : सध्या सोलापुर जिल्ह्यातील करमाळा व अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बिबटयांने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. करमाळा तालुक्यात बिबटयाच्या हल्यात अनेक जनावरांसह दोन व्यक्तींचा जीव गेला आहे. कर्जत व करमाळा तालुक्यातुन इंदापुर व दौंड तालुक्यामध्ये बिबटयाला सहज प्रवेश करता येऊ शकतो या पार्श्वभुमीवर इंदापुर व दौंड तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी येथील एका पुरुषाचा तर अंजनडोह येथील एका महिलेचा बिबटयाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. करमाळा तालुका इंदापुर व दौंड तालुक्याच्या सिमा लगत असल्यामुळे करमाळा तालुक्यातील बिबटया सहज इंदापुर दौंड तालुक्यामध्ये प्रवेश करु शकतो. या पार्श्वभुमीवर वनविभागाच्या वतीने डिकसळ(ता.इंदापुर) येथील नागरिकांनी सतर्क करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

इंदापुर वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. राहुल काळे, वनरक्षक विजय वाघमारे,वनपाल अजय धावटे यांनी नागरिकांना माहिती दिली. यावेळी डिकसळचे पोलिस पाटील संदीप पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते विनायक काळे, संजय भादेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी उजनी धरणाच्या पाण्यामुळे डिकसळ पुल व खानवटे पुल या ठिकाणाहुनच बिबटया इंदापुर तालुक्यातील प्रवेश करुन शकतो त्या ठिकाणी पिंजऱ्यांची व्यवस्था करावी अशी मागणी केली. 

यावेळी बोलताना वनअधिकारी डॉ. राहुल काळे म्हणाले, करमाळा तालुक्यामध्ये बिबटया असल्याचे दिसुन येत आहे. करमाळा तालुका हा इंदापुरच्या सिमेलगत असल्यामुळे या भागांमध्ये बिबटया येऊ शकतो यामुळे नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणे टाळावे, तसेच लहान मुलांची योग्य ती काळजी घ्यावी. बिबटयाबाबत काही माहीती मिळाल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा.

(संपादन : सागर डी. शेलार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()