Pune : राष्ट्रीय ग्रंथपाल दिनीच ग्रंथपालांचे उपोषण

पुण्यात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून ग्रंथपालांचे उपोषण सुरू
ग्रंथपालांचे उपोषण
ग्रंथपालांचे उपोषण sakal
Updated on

विश्रांतवाडी : 12 ऑगस्ट या राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या दिवशी (national librarian day) येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ व आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करून विविध मागण्यासाठी ग्रंथपालांचे बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली.

गेल्या दहा वर्षापासून राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील पदभरती प्रक्रिया ही वेगवेगळ्या कारणाने रेंगाळली आहे. त्यात ग्रंथापाल पदाचाहीही समावेश आहे. यासंदर्भात गेली अनेक वर्षापासून शासनदरबारी पाठपुरावा तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक होऊनही अद्याप पदभरतीचा शासन निर्णय निघालेला नाही. परिणामी उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. तसेच राज्यातील पात्रताधारक नोकरी मिळत नसल्याने हलाकीचे जीवन जगत आहेत

ग्रंथपाल हा महाविद्यालयातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्रंथालय हे त्या संस्थेचा आत्मा समजला जातो. भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी देशात ग्रंथपालांचा यथोचित गौरव केला जातो. मात्र महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेऊन पात्रता संपादन करूनही ग्रंथपालांना हक्काची नोकरी मिळवण्यासाठी उपोषणाला बसावे लागत आहे.

ग्रंथपालांचे उपोषण
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गोणपाटाचा पोषाख केलेल्या फोटोची स्टोरी

पुणे येथील उच्च शिक्षण संचालनालय कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे दिलीप भिकुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भताने, प्रदीप बागल, आरोग्य विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालय व क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप चोपडे,राजेश अगावणे, डॉ. प्रवीण पंडित, संतोष केंगले, प्रवीण घुले, आनंद नाईक, चित्रांगिनी टाक, सरिता स्थूल, शांतीलाल अहिर, वैशाली पानसरे आदी उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष प्रदीप बागल, विश्वस्त दिलीप भिकुले यांनी उपोषणात सहभाग घेऊन पाठिंबा दिला व दररोज संघटनेचे सदस्य उपोषणस्थळी उपस्थित राहून सहभाग घेतील असे सांगितले. तसेच अधिसभा सदस्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षण संघ पुणेचे अध्यक्ष डॉ. सोपान राठोड यांनी आंदोलनाला पाठिंबा देत त्यांची सदस्य आंदोलनात सहभाग घेतील असे सांगितले.

ग्रंथपालांचे उपोषण
Pune : सोसायटीच्या कर्मचाऱ्यांकडून चार लाख रुपयांची फसवणूक

संघटनेच्या मागण्या :

  • अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती ही प्राचार्य पदाच्या भरतीच्या धर्तीवर तात्काळ सुरु करावी.

  • ४ मे २०२० रोजी पदभरतीवर निर्बंध लादण्याअगोदर ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार पदभरतीची परवानगी (एनओसी) मिळाली आहे अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी.

  • खासगी विनाअनुदानित संस्थेमधील ग्रंथपालांना समान काम समान वेतन हे धोरण ठेवून विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेली वेतनश्रेणीनुसार वेतन मिळावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()