पुणे - पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या चीफ ऑफ स्टाफ’पदी (Chief of Staff) लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया (Arvind Walia) यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून नुकतेच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी वालिया व त्यांच्या पत्नी अनिता वालिया यांचे सर्व अधिकाऱ्यांनी स्वागत केले.
लेफ्टनंट जनरल वालिया हे देहरादूनच्या इंडियन मिलिटरी ॲकॅडमीचे (आयएमए) माजी विद्यार्थी आहेत. आयएमएतील प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिष्ठित रौप्य पदकाने गौरविण्यात आले. दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे आणि सिकंदराबादच्या संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयाचे ते पदवीधर आहेत. तसेच येथील प्रशिक्षक म्हणून ही त्यांनी काम पाहिले. वालिया यांनी लष्कराच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यात अभियांत्रिकी पदवी (ऑनर्स), बीआयटीएस पिलानीमधून स्थापत्य अभियांत्रिकी, मद्रास विद्यापीठातून एमएससी संरक्षण आणि सामरिक अभ्यास, उस्मानिया विद्यापीठातून व्यवस्थापन अभ्यासातील पदव्युत्तर अशा विविध पदवीचे समावेश आहे.
आपल्या लष्करी कार्यकीर्दीत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. तर १९८६च्या अभियंता तुकडीचे ते ज्येष्ठ अधिकारी होते. डोंगराळ भागात कार्यरत लष्करी ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर, संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकात्मिक मुख्यालयातील प्रमुख अभियंता शाखेचे संचालकपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्याचबरोबर बंगळूर येथे एमईजी आणि केंद्राच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तसेच, जम्मू -काश्मीरमध्ये रेजिमेंट प्रमुख आणि पश्चिम आघाडीवर एक अभियंता ब्रिगेडचे ते प्रमुख होते. लष्कराच्या विविध विभागात विस्तृत कार्यांचा वालिया यांना अनुभव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.