आत्मनिर्भर करण्यासाठी लाईटहाऊस प्रकल्प महत्वाचा; चंद्रकांत पाटील

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘लाईटहाऊस’ हा प्रकल्प राबविला जात आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patilesakal
Updated on
Summary

पुणे महापालिकेतर्फे नागरिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘लाईटहाऊस’ हा प्रकल्प राबविला जात आहे.

पुणे - पुणे महापालिकेतर्फे (Pune Municipal) नागरिकांना आत्मनिर्भर (Self-reliant) करण्यासाठी ‘लाईटहाऊस’ हा प्रकल्प (Lighthouse Project) राबविला जात आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच त्यांचा सर्वांगिन विकासही होणार आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले.

पुणे महापालिका व पुणे सिटी कनेक्टतर्फे कोथरूडच्या आयडियल कॉलनी येथे लाइट हाऊस प्रकल्प उभा केला आहे. याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. हा प्रकल्प महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नातून सुरू झाला आहे. उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे सिटी कनेक्टचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, मंजुश्री खर्डेकर, अल्पना वरपे, डॉ. श्रध्दा प्रभुणे, वृषाली चौधरी, स्वप्नाली सायकर, नगरसेवक जयंत भावे, पुनीत जोशी यावेळी उपस्थित होते.

Chandrakant Patil
मुक्कामाचे ठिकाण असलेले कारगिल झालंय पर्यटनस्थळ : फिरोज खान

पाटील म्हणाले, लाईटहाऊस येथून शिक्षण घेऊन तंत्रकुशल झालेल्या युवकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून देणे, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही महापालिकेने विचार करावा.

जावडेकर म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या कौशल्य विकास योजने अंतर्गत भारत संपूर्ण जगाला तंत्रकुशल मनुष्यबळ पुरवेल, याची खात्री आहे. महापौर मोहोळ म्हणाले, 'नागरिकांना केवळ भौतिक सुविधा उपलब्ध करून न देता त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()