पुणे : पोल्ट्री शेडमध्ये बनावट मद्याचा कारखाना, दोघांना कोठडी

राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाची कारवाई
Pune Division State Excise
Pune Division State Excisesakal
Updated on

पुणे : पोल्ट्री उद्योगाच्या नावाखाली दौंड तालुक्यात बनावट मद्याचा कारखाना चालविणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने अटक केली. दोघा संशयितांकडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

कैलास सुदाम घुंगुर्डे (वय २४, रा. कानगाव, दौंड), मोहन जगन्नाथ सूळ (वय ३३, रा. पाटस, दौंड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कानगाव हद्दीत घोगरे वस्तीलगत बनावट देशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून उत्पादन शुल्कच्या ‘जी’ विभागाने २१ मार्चच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.

त्यावेळी एका वाहनातून बनावट देशी दारूच्या १४४ बाटल्या आढळून आल्या. तपासादरम्यान, आरोपींनी बनावट दारू दौंड तालुक्यातील लाळगेवाडी येथे कुक्कुटपालन पोल्ट्री शेडमधून आणल्याचे सांगितले. त्या पोल्ट्री शेडची तपासणी केली असता त्याठिकाणी देशी आणि विदेशी दारू तयार करण्याचे रसायन, दोन सीलिंग मशिन असा सुमारे दोन लाख ८८ हजारांचा मुद्देमाल आढळून आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.