Baramati News : बारामतीजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई! 12 लाख 61 हजारांचे मद्य जप्त

गोवा राज्य निर्मित मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते.
Liquor worth Rs 12 lakh 61 thousand seized in the action taken by State Excise Department newa Baramati
Liquor worth Rs 12 lakh 61 thousand seized in the action taken by State Excise Department newa Baramati
Updated on

बारामती: गोव्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या वाहतूकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत 12 लाख 61 हजार रुपये किंमतीच्या मद्यासह एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक उत्तमराव शिंदे, सुजित पाटील, संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंड विभागाने ही कारवाई केली. रविवारी (ता. 16) गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरीता असलेल्या अहमदनगर जिल्ह्याकडे होत असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर ही कारवाई केली.

गोवा राज्य निर्मित मद्याची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर आवक केली जाते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दौंडच्या पथकाने मोहिम राबवली. वाहनांच्या तपासणी दरम्यान दौंड विभागातील मोरगाव-सुपे रस्त्यावर मुर्टी गावच्या हद्दीत हॉटेल सानिका जवळ संशयित वाहन (क्र. एमएच 16 सीडी 5419) हे बोलेरो पिक-अप वाहन व वाहन (क्र. एमएच 12 एमएफ 6575) ही ह्युदाई कंपनीची क्रेटा गाडी थांबवून वाहन चालकांकडे चौकशी केली. दोन्ही वाहनचालकांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने तपासणी केली असता, वाहनात आंब्याच्या रिकाम्या लाकडी पेट्यांच्या आड लपवून गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेले विविध विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या.

या प्रकरणी नामदेव हरिभाऊ खैरे, संदीप बबन सानप, गोरख भगवान पालवे, महेश गुलाबराव औताडे (सर्व रा. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली.

सदर कारवाईत निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, शुभम भोईटे, केशव वामने, नवनाथ पडवळ, अशोक पाटील, चंद्रकांत इंगळे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरिक्षक प्रदीप झुंजरुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.