Coronavirus : खासगी रुग्णालयाच्या बिलासाठी काढले कर्ज

Coronavirus : खासगी रुग्णालयाच्या बिलासाठी काढले कर्ज
Updated on

पुणे - सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त बिल कोरोनाचे उपचार करताना खासगी रुग्णालयांनी वसूल केले. रुग्णालयांनी सहकार्य न केल्यामुळे, अनेक रुग्णांना ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’सारख्या उपलब्ध विमा योजनेचाही उपयोग करता आला नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना कोरोनासंबंधी रुग्णालयांची बिले भरण्यासाठी कर्ज काढावे लागले, अशी कैफियत रुग्णाच्या नातेवाइकांनी मांडली.

कोरोना साथीच्या उद्रेकात खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून खूपच जास्त शुल्क आकारले. रुग्ण हक्कांचे उल्लंघन केले. याबद्दल जन आरोग्य अभियानतर्फे राज्यस्तरीय जनसुनवाई आयोजित केली. त्यात नातेवाइकांनी भावना व्यक्त केल्या. कोरोनावरील उपचार घेताना रुग्णालयांमध्ये आलेले क्लेशकारक अनुभव त्यांनी सांगितले. 

कोरोनाबाधीतांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी कमाल फी किती आकारावी याबाबत राज्य सरकारने नियम केले होते. राज्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी उल्लंघन केल्याचे यातून स्पष्ट  झाले. जन आरोग्य अभियानाकडे जनसुनवाईच्या आधीच राज्याच्या विविध भागातून तीसपेक्षा जास्त तक्रारी आल्या. तसेच, जनसुनवाईदरम्यान शंभरहून जास्त फोन महाराष्ट्रातील विविध भागातून आले. ज्येष्ठ सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते डॉ. अनंत फडके,  ॲड. लारा जेसानी आणि डॉ. अभिजित मोरे यांच्या पॅनेलपुढे कोल्हापूर, पुणे, नाशिक, यवतमाळ व मुंबई येथील निवडक रुग्ण व कार्यकर्त्यांनी तक्रारी मांडल्या.

डॉ. फडके म्हणाले, ‘खासगी हॉस्पिटलनी भरमसाट बिले आकारणे म्हणजे महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आहे. म्हणून त्या हॉस्पिटलविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे.’

आईला दवाखान्यात दाखल करून घेण्यासाठी ८० हजार रुपये मागितले. आईची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येऊनही रुग्णालयाने पाच दिवस आम्हाला कळवलेच नाही. त्यातच आईचा मृत्यू झाल्या. त्यानंतर संपूर्ण बिल भरेपर्यंत आईचा मृतदेह दिला नव्हता. रुग्णालयाच्या जवळच स्मशानभूमीत नेण्यासाठी शववाहिकेचे १६ हजार रुपये आकारले. एका कच्च्या कागदावर दीडलाख रुपयांचे बिल देण्यात आले, आजपर्यंत कुटुंबाला उपचाराची कागदपत्रे आणि मृत्यूचा दाखल दिलेला नाही.
- संदीप धांडे, यवतमाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.