पुणे - फायनान्स कंपनीच्या (Finance Company) वसुली एजन्सीच्या (Recovery Agency) लोकांनी कर्ज घेतलेल्या नागरीकास डांबुन ठेवत मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या घटनेच्या धसक्याने नागरीकाची प्रकृती ढासळली. याप्रकरणी संबंधीत फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या एजन्सीच्या चालक, मालकासह सहा जणांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. हि घटना 26 जुनला स्वारगेट परिसरातील हॉटेल नटराज येथे घडली. (Loanwaiver the Recovery Company will Beating Crime)
याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका 52 वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन श्री एंटरप्रायझेस रिकव्हरी एजन्सीचा चालक, मालक व तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 जून रोजी दुपारी चार ते सायंकाळी सातच्या सुमारास नटराज हॉटेलजवळच्या रिकव्हरी एजन्सीजच्या कार्यालयात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. तर श्री एंटरप्रायझेस रिकव्हरी एजन्सीकडे संबंधीत फायनान्स कंपनीच्या कर्जाची वसूली करण्याचे काम आहे. त्यातूनच एजन्सीच्या लोकांनी फिर्यादीस कर्जवसुलीसाठी त्यांच्या कार्यालयामध्ये डांबुन ठेवले. त्यानंतर त्यांच्याकडून जास्त रक्कम वसूल करण्यासाठी त्यांना शारिरीक व मानसिक त्रास दिला. हॉकीस्टीक, लोखंडी रॉडची भिती दाखवून पैसे न दिसल्यास हातपाय काढण्याची धमकी दिली. फिर्यादी हे तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना जीन्यात अडवून धक्काबुक्की करीत त्यांना मारहाण केली. या प्रकारामुळे फिर्यादीची प्रकृती ढासळल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.