पुण्यात रोज 50 कोटींचे नुकसान; आर्थिक श्वास कोंडला

पुण्यात रोज ५० कोटींचे नुकसान, व्यापारी, ग्राहक हवालदिल
Lockdown
Lockdownsakal
Updated on

पुणे : कोरोना (corona) रुग्णांचे प्रमाण कमी होत असताना, निर्बंधांचा जाच कायम राहिल्यामुळे शहराचा आर्थिक श्वास कोंडला आहे. एरवी या शहराची रोज सुमारे १०० कोटी रुपयांची होणारी किरकोळ आणि घाऊक विक्रीची उलाढाल आता निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले असून, ग्राहकही अस्वस्थ झाले आहेत. (lockdown effect pune financial situation worth)

पुणे शहरातील रुग्णांची संख्या कमी होत आहे, हे आकडेवारीवरून सिद्ध होते. मात्र, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या स्थिर असून, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. पुणे शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे, तर जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या आतमध्येच आहे. व्यवसाय आणि प्रशासकीयदृष्ट्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा हे तिन्ही वेगवेगळे घटक आहेत. परंतु, राज्यस्तरावर पुण्याचा एकत्रित विचार होत असल्यामुळे शहरावर अन्याय होत असल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारून सायंकाळी चार नंतरही व्यवसाय सुरू ठेवण्यास प्रारंभ केला आहे.

मुंबईचा विचार करताना राज्य सरकारने मुंबई महापालिका हद्द, असा विचार केला आहे. परंतु, पुण्याचा मात्र, जिल्हा म्हणून विचार होत असल्यामुळे शहरातील रुग्णसंख्या कमी झाली तरी, निर्बंध कायम आहेत. पुण्यात सुमारे सव्वा लाख लहान-मोठे व्यावसायिक आहेत. त्या सर्वांना राज्य सरकारच्या निर्बंधांचा फटका बसत आहे. परिणामी पुण्याचा आर्थिक श्वास कोंडला आहे. पुणे व्यापारी महासंघ, हॉटेल्स, मॉल्स असोसिएशननेही निर्बंध शिथिल करण्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तरीही ते अद्याप शिथिल झालेले नाहीत. दरम्यान, शहर भाजप आणि शहर काँग्रेसने व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या जास्त होती, तेव्हा व्यावसायिकांच्या संघटनांनी राज्य सरकारला सहकार्य केले. मात्र, आता पुणे शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना प्रशासन ते शिथिल का करीत नाहीत, हा व्यावसायिकांचा प्रश्न आहे.

Lockdown
पुणे : निर्बंध जोमात; व्यावसायिक कोमात

शहरातील व्यावसायिकांचे होणारे नुकसान (उलाढालीचे आकडे कोटी रुपयांत)

व्यवसायाचा व्यावसायिकांची एरवीची सध्याची

प्रकार संख्या उलाढाल उलाढाल

  • हातगाडीवाले, फेरीवाले, ४८ हजारांपेक्षा जास्त १० ४

    पथारी, स्टॉल व्यावसायिक

  • व्यावसायिक दुकानदार ४० हजार ७० ३०

    (८१ संघटना)

  • हॉटेल, बार ९ हजार १२ ६

  • संघटनांशी नोंदणीकृत

    नसलेले अन्य व्यावसायिक १० हजार १० ४

(*ही आकडेवारी संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींकडून मिळाली आहे.)

Lockdown
राज्य बॅंकेमध्ये रुपीच्या विलिनीकरणास रिझर्व्ह बॅंकेचा नकार

पुणे शहरातील कोरोना रुग्णांचे घटते प्रमाण...

तारीख नवे रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

३० जुलै २३६ ३.३९ टक्के

३१ जुलै २६० ३.०८

१ ऑगस्ट २५६ ३.८१

२ ऑगस्ट १४२ १.९७

३ ऑगस्ट २३७ ४.३६

४ ऑगस्ट २४९ २.९९

(३० जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी चाचण्यांची संख्या कमी होती.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.