लॉकडाऊन वाढणार; पण...

लॉकडाऊन वाढणार; पण...
Updated on

पुणे : मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन वाढण्याची चिन्हे असताना, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर ऑफिसेस, दुकानांमध्ये कशा पद्धतीने वागले पाहिजे, याच्या गाईडलाईन्स स्मार्ट सिटी प्रशासनाने गुरुवारी रात्री जाहीर केल्या. त्यात लग्नसमारंभ आणि अत्यंविधीला किती लोकांनी उपस्थित राहायचे, याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील, असे म्हटले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असेही बजावण्यात आले आहे.

पुणे आणि मुंबईत लॉकडाऊन वाढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर ऑफिसेस, कारखाने, व्यवसायाच्या ठिकाणी दिलेल्या शिथिलतेमध्ये कोणती खरबदारी घ्यायची, याच्या सूचना केंद्र सरकारने गुरुवारी रात्री पाठविल्या. त्यानुसार....

सार्वजनिक ठिकाणी घ्यायची काळजी

- मास्क सक्तीचाच, सोशल डिन्स्टसिंगच्या नियमांचे पालन व्हायलाच पाहिजे
- कामाच्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये
- लग्न, अंत्यविधीच्या ठिकाणी किती लोकांनी एकत्र यायचे, याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई
कामाच्या ठिकाणी अशी घ्या काळजी
- कामाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग (तापमान नोंदणीसाठी यंत्रणा), सॅनिटायझर हवे
- जेवणाच्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून एक तासाचे रोटेशन हवे
- ज्येष्ठ नागरिक, तसेच पाच वर्षाखालील मुलांच्या पालकांना वर्क फ्रॉम द्या
- आरोग्य सेतूचा वापर आवश्यक, निर्जतुंकीकरण ठराविक वेळेने हवे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- मोठ्या संख्येने बैठका नकोच
- आहार, प्रतिकार क्षमता वाढविण्याच्या उपाययोजनांची कामगारांना माहिती द्या
- प्रवेशद्वार, उपहारगृह, लिफ्ट, स्वच्छतागृह, लॉबी येथे सतत निर्जुंतीकरण हवे
- कामगारांसाठी स्वतंत्र बस हवी, त्यात क्षमतेच्या 40 टक्के प्रवासी हवे
- कामगारांचा आरोग्य विमा सक्तीचा
- सॅनिटायझर, हॅन्डवॉश पुरेशा संख्येने हवे
- लिफ्टमध्ये दोन किंवा चारपेक्षा जास्त व्यक्ती नको (लिफ्टच्या आकारानुसार)

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- जिन्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्या
- तंबाखू, गुटखा यांना बंदी
- गरज नसलेल्या व्हिजिटरला बंदी घाला
- नजीकच्या ठिकाणी असलेले दवाखाने, हॉस्पिटल यांची यादी दर्शनी भागात लावावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.