पुणे : लोहगाव इथं साकार होत असलेला आणि जवळपास १२ वर्षांपासून रखडलेला ५५०० पोलिसांच्या घरांची महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी (एमपीएमसी) ही टाऊनशिप आत लवकरच कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पात नेदरलँड येथील निमशासकीय संस्थेनं ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याची टर्मशीट शनिवारी एमपीएमसीचे अध्यक्ष भरतकुमार राणे यांच्याकडं हस्तांतरीत करण्यात आली. त्यामुळं लवकरच ५५०० पोलीस बांधवांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत मिळेल, अशी माहिती रुरल एन्हान्सर्स संस्थेचे प्रमुख आणि विदेशी गुंतवणुकीचे (एफडीए) समन्वयक अंबर आयदे यांनी दिली.