Lok Sabha Election : लोकसभा-विधानसभा निवडणुकीपुर्वी समान नागरी कायदा लागू करावा - चंद्रशेखर बावनकुळे

"भाजप 51 टक्के मते मिळवेल असे चित्र नाही, त्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अन्य घटकांना बरोबर घेणार का ?
lok sabha assembly election Uniform Civil Code chandrashekhar bawankule politics
lok sabha assembly election Uniform Civil Code chandrashekhar bawankule politics esakal
Updated on

पुणे : "राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करावा, हिच आमची भुमिका आहे. त्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारला पत्र दिले आहे. लोकसभा व विधानभा निवडणुकीच्यापुर्वी समान नागरी कायदा लागू करावा, अशी आमची मागणी आहे.'' असे ठामपणे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी भाजपची आगामी निवडणुकांमधील दिशा स्पष्ट केली.

भाजपकडून "मोदी@9 ' आणि "संपर्क ते समर्थन अभियान'अंतर्गत राज्यात विविध ठिकाणी जाऊन कार्यकर्ते, नागरीक व संस्थांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. त्याअंतर्गत बावनकुळे यांनी शुक्रवारी "सकाळ' कार्यालयास भेट दिली. "सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस व कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी बावनकुळे यांचे स्वागत केले. यावेळी बावनकुळे यांच्याशी "सकाळ'च्या सर्व आवृत्यांच्या संपादकांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला.

"भाजप 51 टक्के मते मिळवेल असे चित्र नाही, त्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अन्य घटकांना बरोबर घेणार का ? या प्रश्‍नावर बावनकुळे म्हणाले, ""भाजपला राज्यात 51 टक्के मते प्राप्त करण्याच्या लढाईसाठी भर घालावी लागेल. एकीकडे संघटनात्मक बांधणी करतानाच, दुसरीकडे मित्र पक्षांनाही बरोबर घेत आहोत.

महादेव जानकर, सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेच्या ज्योती मेटे यांनाही बैठकीसाठी बोलावले आहे. प्रस्थापितांविरुद्धचे वातावरण कसे आहे, हे शोधावे लागेल. सरकारचे काम जेवढे वाढेल, त्याचा फायदा पक्षाला होईल. जिथे आम्ही अपुर्ण आहोत, तिथे भर घालण्याची आमची योजना तयार आहे.अनेक योजना लोकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत नेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्पही आम्हाला बळ देईल.''

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, त्यासाठी मित्रपक्षांची बैठक घेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेबाबत बावनकुळे म्हणाले, ""शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये यायची इच्छा असेल तर त्यांना प्रवेश दिला जाईल.

lok sabha assembly election Uniform Civil Code chandrashekhar bawankule politics
Chandrasekhar Bawankule : यवतमाळ : कमळाच्या एकामताने देशात परिवर्तन घडवून आणले - चंद्रशेखर बावनकुळे

त्यापुर्वी शिंदे यांच्याशी नक्कीच चर्चा केली जाईल. निवडणुकीपुर्वी तिथली जागा आणि ताकद यांचा अंदाज घेऊन आम्ही त्या चिन्हावर निवडणुक लढवू. मात्र युतीच्या धर्म पालनासाठी एकमेकांचे विचार नक्कीच ऐकून घेतले जातील.''

"सकाळ'च्या सर्वेक्षणाचे कौतुक

"सकाळ'च्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी सर्वेक्षणातील महत्वाची निरीक्षणे, आकडेवारी व ठळक मुद्यांवर यावेळी प्रकाश टाकला. त्यावेळी बावनकुळे यांनी "सकाळ'ने केलेल्या सर्वेक्षणाचे आवर्जुन कौतुक केले. सर्वेक्षणातुन निवडणुकांच्या तयारीसाठी काही महत्वाच्या गोष्टी पुढे आल्या आहेत, त्याचा आमच्या अभ्यासासाठीही निश्‍चित उपयोग होईल, असे सांगितले.

lok sabha assembly election Uniform Civil Code chandrashekhar bawankule politics
Chandrashekhar Bawankule : जागावाटप दिल्लीतूनच, राज्यात कुणालाही अधिकार नाही; बावनकुळेंचं मोठं विधान

अजित पवारांमुळे जागा वाढतील, सुप्रिया सुळे बारामती लढणार नाहीत

अजित पवार यांच्याकडे कार्यकर्ता सांभाळण्याची ताकद आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी कधीही सोडणार नाहीत, याऊलट ते प्रदेशाध्यक्ष झाल्यास राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या जागांमध्ये निश्‍चितच वाढ होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षपदी अजित पवार व छगन भुजबळ यांची नावे पुढे येतील, अशी शक्‍यता होती, प्रत्यक्षात दुसरी नावे पुढे आली, असे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे बारामतीमधून लढणार नाहीत, तर त्या विधानसभेची निवडणुक लढवतील. बारामतीसाठी आमचाही उमेदवार तयार आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.

भाजप वेगळ्या विदर्भाच्या भुमिकेवर ठाम

भाजपने वेगळ्या विदर्भाची मागणी अजूनही सोडलेली नाही, वेगळ्या विदर्भाबाबत निर्णय केव्हा येईल, हे सांगता येत नाही. मुळात महाराष्ट्राच्या स्थापनेपासून विदर्भ-मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले आहे. आत्तापर्यंत पश्‍चिम महाराष्ट्राकडेच 80 टक्के निधी वळविला जात होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विकासाचा हा अनुशेष भरण्यावर भर दिला जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

lok sabha assembly election Uniform Civil Code chandrashekhar bawankule politics
Chandrasekhar Bawankule : यवतमाळ : कमळाच्या एकामताने देशात परिवर्तन घडवून आणले - चंद्रशेखर बावनकुळे

बावनकुळे म्हणाले,

- "बीआरएस'साठी महाराष्ट्र सोपा नाही, महाराष्ट्रातील जनता व नेतृत्व प्रचंड प्रगल्भ.

- "बीआरएस'चा महाराष्ट्रात परिणाम यायला वेळ लागेल

- शरद पवार धर्मांतर कायदा, गोहत्या बंदी कायद्याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना जाब विचारणार का ?

- नवनीत राणा कमळ चिन्हावर लढल्या तर ठिक, अन्यथा अमरावतीसाठी पर्याय उपलब्ध

- शरद पवार, बंटी पाटील यांचे ट्‌विट, भाषणे दंगलींना प्रोत्साहन देत होत्या

- औरंगजेब कबरीला भेट देण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रकार अकोलेकर व त्यांच्या समाजालाही आवडला नाही

- साताऱ्यामधील दोन राजांमध्ये रस्त्यावर झालेला वाद योग्य नाही

- व्यक्ती मोठा नाही, पक्ष महत्वाचा आहे

- राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा तिढा सुटत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.