Shirur Lok Sabha 2024: अजित पवार गटाचा दुसरा उमेदवार ठरला! शिरूरमध्ये आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश

Shirur Lok Sabha 2024: अजित पवार गटाने शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार आयात करुन खासदार अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले आहेत.
Shirur Lok Sabha 2024
Shirur Lok Sabha 2024esakal
Updated on

Shirur Lok Sabha 2024: अजित पवार गटाने शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार आयात करुन खासदार अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले आहेत. शिवसेना शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे, अशी लढाई निश्चित झाली आहे.

अजित पवार गटाने शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार आयात करुन खासदार अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध मैदानात उतरवले आहेत. शिवसेना शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. जुन्या खेड व आताच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रसेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी २०१९ ला गड जिंकला. २०१९ मध्ये शरद पवार यांनी शिवसेनेतून उमेदवार आयात केला होता. अमोल कोल्हे शिवसेनेत होते.

Shirur Lok Sabha 2024
Raghuram Rajan: 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र होणार म्हणजे मूर्खपणा, रघुराम राजन असं का म्हणाले?

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे शिरूरची लढाई, आत्मसन्मान आणि अस्तित्वाची होणार आहे. राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट आहेत. तर शिवाजी आढळराव यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे आता आढळराव विरुद्ध कोल्हे अशी लढाई होणार आहे.

अजित पवार पत्रकार परिषद घेऊन आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करणार आहेत. यापूर्वी अजित पवार यांनी रायगडमधून सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली.

Shirur Lok Sabha 2024
ByElection Cancelled: 'अकोला पश्चिम' विधानसभा पोटनिवडणूक हायकोर्टाकडून रद्द! काय घडलंय नेमकं जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.