Lok Sabha Election: मध्य वस्तीतील पेठांवर ठरणार कसब्याचा कौल, कसं आहे लोकसभेचं गणित

Lok Sabha Election: महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांच्यासाठी कसबा हे हक्काचे ठिकाण आहे, तर भाजपसाठी येथील मतदार हा हक्काचा आहे. त्यामुळे कसब्याची चुरस वाढलेली दिसते.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal
Updated on

भाजपचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून गणल्या जाणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी सुरुंग लावला होता. या विधानसभा मतदारसंघातून मिळालेले लीड हे उमेदवाराचा विजयाचा मार्ग सोपा करणारे ठरेल. महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांच्यासाठी कसबा हे हक्काचे ठिकाण आहे, तर भाजपसाठी येथील मतदार हा हक्काचा आहे. त्यामुळे कसब्याची चुरस वाढलेली दिसते.

कसब्याच्या पोटनिवडणुकीची घटना जेमतेम वर्षभरापूर्वीची आहे. त्यानंतर आता लोकसभेच्या पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा धंगेकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ५०.०६ टक्के मतदान झाले होते. या वेळी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात ५९.२४ टक्के झाले. म्हणजे ९.१८ टक्क्यांनी मतदानाचा टक्का वाढला. हा वाढलेला मताचा टक्का विधानसभा मतदारसंघाचा कल ठरविणार आहे, हे निश्चित.

कसबा विधानसभा मतदारसंघात १५, १६, १७, १८, १९ आणि २९ या महापालिकेच्या प्रभागांचा समावेश होतो. यापैकी भाजपचा प्रभाव असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत सदाशिव, नारायण, शनिवार या मध्यवस्तीतील पेठांमधून मतदानाचा टक्का घसरला होता. त्याचा फटका भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना बसला. १६, १७, १८ आणि १९ हे प्रभाग शहराच्या पूर्व भागात आहेत.

पोटनिवडणुकीत कागदीपुरा भागातून धंगेकर यांना साडेचार हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्याचबरोबर दुधभट्टीच्या परिसरातील १७, जैन मंदिराजवळील १८ आणि लोहियानगर परिसर १९ या प्रभागातील मतदारांनी सातत्याने काँग्रेसला हात दिला आहे. त्यानंतर लोकमान्यनगर, दत्तवाडी, सानेनगर वसाहत, राजेंद्रनगर यात या २९ क्रमांकाच्या प्रभागांमध्ये ३३ याद्या आहेत. त्यामुळे १५ आणि २९ या प्रभागांतून भाजप किती मताधिक्य घेतो, त्यावर कसब्याच्या निकालाची दिशा अवलंबून असेल.

कसब्याने २००९ पासून कायमच भाजपला भरभरून मतदान केले आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासाठी कसबा हे घरचे मैदान होते. त्यामुळे २०१९ पुणे लोकसभा निवडणुकीत कसब्याने बापटांना ६५ टक्के मते दिली होती. कसब्यातून २००९ (४१.६० टक्के), २०१४ (६१ टक्के ) आणि २०१९ (६५ टक्के) या प्रत्येक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांचा आकडा वाढलेला दिसतो. यंदाच्या निवडणुकीत हे सातत्य राहील की, पोटनिवडणुकीप्रमाणे कसबा पुन्हा काँग्रेसला हात देईल, याचा निर्णय सदाशिव, नारायण, शनिवार पेठेवर ( प्रभाग १५) अवलंबून असेल.

Lok Sabha Election
Pune Loksabha: धंगेकर की मोहोळ? कँटोन्मेंटमधील 'हे' गणित ठरवणार कोणत्या उमेदवाराला मिळणार आघाडी

महत्त्वाचे असे काही

काँग्रेसचे विद्यमान आमदार स्थानिक असल्याचा फायदा

सदाशिव, नारायण, शनिवार पेठेवर गणिते अवलंबून

२००९ पासून भाजपला भरभरून साथ

दुधभट्टी, जैन मंदिर, लोहियानगर परिसरात काँग्रेसची ताकद

Lok Sabha Election
Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.