लोणावळ्याला फिरायचा प्लान करताय! आधी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश वाचा

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश
Tourist places lockdown update
Tourist places lockdown updatesakal
Updated on

लोणावळा : जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांची वाढती संख्या आणि ओमायक्रॉनचा (omicron) वाढता प्रभाव या संकटामुळे लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, गड-किल्ले, लेण्यांसह जिल्हाभरातील पर्यटनस्थळे ‘लॉकडाऊन’ (Lockdown) करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी याबाबत आदेश दिले आहेत.त्यानुसार मंगळवारपासून जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, भोर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर या सात तालुक्यातील पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटन स्थळांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू झाला असून गर्दी आढळल्यास पोलिस गुन्हा दाखल करणार आहे.(Tourist places lockdown update)

Tourist places lockdown update
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सिंहगड पर्यटकांना बंद, वन विभागाची माहिती

सदर आदेशात सात तालुक्यातील पर्यटन स्थळांसाठी लागू होणार असून ते अनिश्चित कालावधीसाठी लागू असणार आहेत. या निर्बंधानुसार पर्यटन स्थळ परिसरात ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जाण्यास, खाद्यपदार्थ विक्री स्टॉल लावणे, मद्याची वाहतूक करण्यास, ध्वनी व्यवस्था वापरण्यास, प्रदूषण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

ऐतिहासिक वास्तु, गड- किल्ले,स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे इत्यादी ठिकाणी नागरीक मोठया प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. सदर ठिकाणी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मोठया प्रमाणात नागरीकांची गर्दी होते.

Tourist places lockdown update
कोविडकाळात शेकडो कोटींची लूट; ठाकरे-पवारांवर सोमय्यांचे नवे आरोप

विविध ठिकाणी खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल मोठया प्रमाणात लावण्यात आलेले असतात. सदर खाद्य पदार्थ विक्री स्टॉलवार पर्यटक विना मास्क, सोशल डिस्टनसींगचे पालन न करता गर्दी करतात, त्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टनसींगचे पालन होणार नाही.

सध्या देशभरात कोरोनाचा उद्रेक झालेला पहावयास मिळत आहे. पुणे ग्रामीण जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रसार ओमायक्रॉन व्हेरियंटसह मोठया प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. पर्यटकांची सुरक्षा व कोणत्या प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक आदेश करण्याची विनंती केली होती.

Tourist places lockdown update
उत्तर प्रदेश : मायवतींचा निवडणूक न लढण्याचा निर्णय; कोणाच्या फायद्याचा?

प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सध्या मास्क वापराची सक्ती करण्यात येत असून नागरिकांकडून दंड आकारण्यात येत आहे. गर्दीला आवर घालत पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी अखेर पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोणावळा, खंडाळा, कार्ला परिसरातील भुशी डॅम, लायन्स पॉइंट, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर इत्यादी स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत.

Tourist places lockdown update
CM योगींच्या मंत्र्याचा राजीनामा; भाजपसोडून सायकलवर स्वार

अर्थकारणास पुन्हा एकदा ‘ब्रेक’

मावळ तालुका, लोणावळा निसर्ग संपदेने समृद्ध आहे.येथील अर्थकारण प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत पर्यटन बंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले, आर्थिक संकट सोसावे लागले.

आहे. हॉटेल्स, रिसोर्टस, चिक्की व्यवसायांवर संक्रांत आली. टुरिस्ट, टॅक्सी , रिक्षा व्यवसाय पर्यटनावरच चालतो. आता पुन्हा एकदा पर्यटन बंदीमुळे येथील अर्थकारणास पुन्हा एकदा ‘ब्रेक’लागण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.