Pune Crime : कोयत्याने वार करत दहशत निर्माण करून मारहाण करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Crime latest news in Marathi | शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण करून दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण करणाऱ्याच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
Loni Kalbhor police arrested two for stabbing with koyta crime update pune
Loni Kalbhor police arrested two for stabbing with koyta crime update punesakal
Updated on

उरुळी कांचन : शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण करून दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण करणाऱ्याच्या लोणी काळभोर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या प्रकरणी राज रवींद्र पवार (वय २५, रा. कवडीपाड गुजर वस्ती, ता. हवेली), जगदीश सोमनाथ घाडगे (वय २४, रा. मोरे वस्ती, फुरसुंगी फाटा, ता. हवेली) या दोघांना ही लोणी काळभोर पोलिसांनी अटक आहे.

तर इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संकेत संतोष कदम (वय २१, रा. लेन नं. ०६, अष्टविनायक कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत कदम आणि त्यांचे मित्र शैलेश जगताप (रा. गंगानगर, पुणे) हे शुक्रवारी (ता. २) रात्री साडे बाराच्या सुमारास गाडीतील पेट्रोल संपल्याने गाडी ढकलत चालेल होते.

Loni Kalbhor police arrested two for stabbing with koyta crime update pune
Pune Rain Update : पुणेकरांनो, सतर्क राहा ;आयुक्त भोसले

ते कदमवाकवस्ती गावाच्या हद्दीतील मनाली रिसॉर्ट जवळील ई. व्ही. चार्जीग स्टेशन जवळून जात असताना तिथे जवळच पाच ते सहा इसम मोटार सायकली जवळ लावून घोळका करुन थांबलेले होते. त्यावेळी एकाने, "भाई येथे थांबला दिसत नाही का तुला, भाईला सलाम न करता पुढे चालला का? असे म्हणून फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली.

यावर फिर्यादी यांनी ओळखत नसल्याचे सांगितले. यावर "अरे तू राज पवार भाईला ओळखत नाहीस" असे म्हणून "ए जगदीश, राजा, तसेच इतरांना आवाज देऊन अरे हा ओळखत नाही आपल्याला याला आपण आपली ओळख करुन देऊ," असे म्हणत इसमांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ करुन हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच कोयता काढून फिर्यादी यांच्या कानावर व डोक्यावर वार केले. यात दोघांना ही दुखापत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.