Wagholi Crime : लोणीकंद पोलिसांनी गुन्हेगारी टोळीच्या आवळल्या मुसक्या; सात आरोपी अटक, सात पिस्टल व २३ जिवंत काडतुसे हस्तगत

लोणीकंद पोलिसांनी गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.
Crime
CrimeSakal
Updated on

वाघोली - लोणीकंद पोलिसांनी गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. सात जणांना अटक करून त्यांच्याकडील देशी बनावटीचे सात पिस्टल व २३ जिवंत काडतुसे असा सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. गणेशोत्सवाच्या काळात ही यशस्वी कामगिरी पोलिसांनी केली आहे.

२९ ऑगस्ट रोजी या टोळीतील गुन्हेगारांनी कोलवडी परिसरात एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी दोन पथके गुन्हेगाराच्या शोधार्थ तयार केले होते. ते पथक शोध घेत होते. लोहियानगर मधील एन्जॉय ग्रुप मधील सदस्यांनी गुन्हा केल्याचे गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना कळाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.