Nana Patole : अंतर्गत गटबाजीमुळे पुण्यात जागा हाताने घालवली; नाना पटोले यांनी काढली खरडपट्टी

पुण्यात घेतली बैठक
Nana Patole
Nana Patole Sakal
Updated on

पुणे ः पुणे आणि अकोल्यातील पराभव माझ्या जिव्हारी लागलेला आहे. पुण्यात कोणी कोणी बदमाशी केली हे मला माहिती आहे. कार्यकर्त्यांप्रमाणे मलाही खूप संताप आलेला असला तरी मी बैठकीत संयमाने सर्वांचे ऐकून घेत आहे. शहरातील नेत्यांच्या मी पणामुळे, गटबाजीमुळे पुण्याची जागा आपण हाताने घालवली आहे. विधानसभा, महापालिका निवडणुका मला जिंकायच्या आहेत, तुम्ही सुधरा अन्यथा पक्षाकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भर बैठकीत शहरातील पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

Nana Patole
UGC News : लोकपाल नियुक्त न करणाऱ्या विद्यापीठांची यादी UGC कडून जाहीर; महाराष्ट्रातील 'या' प्रमुख विद्यापीठांचा समावेश

पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा सुमारे सव्वालाख मताने पराभव झाला. या पार्श्‍वभूमीवर नाना पटोले यांनी बूथनिहाय आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार धंगेकर, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, रमेश बागवे, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, आबा बागूल आदी यावेळी उपस्थित होते.

Nana Patole
Dhule Leopard News : थांबता थांबेना बिबट्याच्या हल्ल्यांची शृंखला!

नाना पटोले यांनी शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील बूथनिहाय आढावा घेतला. कोणत्या भागात भाजपला मताधिक्य मिळाले, त्याची कारणे काय आहेत असे संबंधित प्रभागाच्या प्रमुखास विचारण्यास सुरुवात केली. कॅन्टोन्मेंट व कसबा मतदारसंघात ज्यांनी काँग्रेसचे काम केले नाही अशा पदाधिकाऱ्यांकडूनही पटोले यांना माहिती देऊन आमच्या प्रभागातून मताधिक्य मिळाले असे सांगितले. त्यावरून चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकीत आक्षेप घेत ‘ज्यांनी विरोधी पक्षाला मदत केली त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे.’’ असा आक्षेप घेतला.

Nana Patole
Nashik News : नांदगाव तालुक्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण, मात्र वरुणराजाने पाठ फिरविल्याने वाढली चिंता

कसब्याच्या पोटनिवडणुकीत ज्या भागात धंगेकरांना जास्त मते होते, तेथे यावेळी मताधिक्य का कमी झाले असा प्रश्‍न प्रभाग प्रमुखांना विचारला? एका माजी नगरसेवकाच्या स्वतःच्या बुथवर काँग्रेसला मताधिक्य मिळाले, पण शेजारच्या बूथवर ३०० मतांनी भाजपचा नगरसेवक पुढे कसा जातो असाही प्रश्न‍ पटोले यांनी विचारला? त्याचे समाधानकारक उत्तरे पदाधिकाऱ्यांना देता आली नाही. त्यावर पटोले यांनी तुम्हाला प्रभागाचा प्रमुख केले, पक्षाचा नेता केला पण तुमचा प्रभाव १०-१५ बुथवर नाही का असा जाब विचारला. दरम्यान वेळेअभावी कोथरूड, पर्वती आणि वडगाव शेरी या तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला नाही.

Nana Patole
Nilesh Lanke News: नगरसाठी रणनीती, मातोश्रीवर लंकेंची खलबतं...

‘‘पुण्याची जागा आपण जिंकणार असल्याचा अहवाल मी राहुल गांधींना पाठवला होता, पण तुमच्या बदमाशीमुळे ही जागा गेली. पुण्याची जागा हारल्याने माझे डोके गरम झालेले आहे. निवडणुकीपूर्वी तुम्हाला प्रत्येकाला जबाबदाऱ्यांचे वाटप केले होते. कार्यकर्ते काम करत होते, पण पदाधिकाऱ्यांनी क्षमता असूनही काम केले नाही. तुम्हाला जमत नसेल तर सांगा अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास तयार आहेत.’’

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

१५०००चे मताधिक्य पुरेसे नाही

कॅन्टोन्मेंटमधून आपल्याला १५ हजाराचे मताधिक्य मिळाले पण ते पुरेसे नाही. पर्वतीमधील स्थिती आपल्याला पोषक होती, तरीही मागे पडलो. सर्व प्रभाग प्रमुखांनी बूथनिहाय बैठक घ्या, विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर मी पुण्‍यात प्रभागनिहाय बैठक घेणार आहे, त्यावेळी कार्यकर्ता काय म्हणतो हे ऐकून घेऊनच विधानसभेचे आणि महापालिकेचे उमेदवार निश्‍चित करणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com