प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसाच्या बाळाला चौघा भावांनी फेकले दरीत

30 जानेवारीला या महिलेची प्रसुती होवून तिने मुलाला जन्म दिला होता.
baby
babye sakal
Updated on

पौड : प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसाच्या बाळाला चौघा भावांनी ताम्हीणी (ता.मुळशी) येथील घाटात दरीत फेकल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ट्रेकर्सच्या माध्यमातून बाळाचा शोध सुरू आहे. संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण, सचिन गंगाराम चव्हाण (सर्व रा.मु.पो. आंबडस, ता. खेड, जि. रत्नागिरी) अशी बाळाला फेकलेल्या आरोपींची नावे आहेत. (Crime News)

याबाबत मंगल विजय पवार (वय 27, रा. गोडांबेवाडी, घोटावडे, ता.मुळशी, मूळ रा. आंबडस, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी याबाबत पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 4 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली असून याबाबत चार जणांवर शनिवारी (12 फेब्रुवारी) गुन्हा दाखल केला आहे.

baby
Vaccination : दोन्ही डोसनंतर किती लोकांचा मृत्यू; केंद्राने दिले उत्तर

पौड पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मंगल पवार यांच्या पहील्या पतीचे निधन झाले होते. त्या अकरा वर्षाची सानिकाबरोबर गोडांबेवाडीत दत्ता कडबा कुट्टी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होत्या. त्यावेळी नात्यातीलच सचिन चव्हाण यांच्याशी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे तिघेही एकत्र राहू लागले. याच काळात त्या गर्भवतीही राहील्या. दरम्यान सचिनचे मंगल यांच्याबरोबर राहणे संजय, नितीन, अजय़ या भावांनाही आवडत नव्हते. यापूर्वीही ते सचिनला रत्नागिरीला घरी घेवून गेले होते. परंतू मंगल यांना नववा महिना सुरू झाल्याने आधाराची गरज होती. त्यामुळे त्यांनी सचिनला बोलावून घेतले.

30 जानेवारीला या महिलेची प्रसुती होवून तिने मुलाला जन्म दिला. संजय, नितीन, अजय आणि सचिन यांनी शुक्रवारी (4 फेब्रुवारी) रात्री 11 च्या सुमारास आपण गावी राहू असे सांगून मंगल, सानिका आणि सहा दिवसाच्या बाळाला टाटा इंडीका गाडी (क्रमांक एम. एच 08 झेड 4503) गाडीत बसविले. ताम्हीणी घाटात दरीपूलाजवळ पहाटे पावनेचारच्या सुमारास गाडी थांबवून चौघा भावांनी मंगल आणि सानिका यांना गाडीत बसविले आणि त्यांच्याकडून सहा दिवसाच्या मुलाला ओढून घेतले. गाडीचे सर्व दरवाजे लॉक केल्यानंतर बाळाला दरीत फेकून दिले. चौघेही गाडीत बसल्यानंतर मंगलने बाळाची चौकशी केली असता गप्प बस नाहीतर तुला व तुझ्या मुलीलाही दरीत फेकून देईन अशी धमकी त्यांनी दिली.

चौघांनीही मंगल आणि सानिकाला आंबडस येथे घरी नेऊन डांबून ठेवले. गुरूवारी (10 फेब्रुवारी) सचिन आणि त्याच्या भावांनी मंगलला गोडांबेवाडी येथे जाऊन रहा असे सांगून तिला गावाबाहेर सोडून दिले. मंगल आंबडसहून माणगाव पोलिस ठाण्यात गेल्या. त्यानंतर पौड पोलिस ठाण्यात आल्या. त्यावेळी घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी आबंडस येथे जावून चौघा भावांना ताब्यात घेतले. त्यावेळी चौघांनीही बाळाला दरीत फेकल्याचे कबूल केले. दरम्यान ट्रेकर्सच्या मदतीने बाळाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पवन चौधरी हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.