तरुणीची फसवणूक करुन थाटला दुसऱ्याच तरुणीशी विवाह

तरुणीच्या भावनांशी खेळ करुन लैंगिक अत्याचार, 25 लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक
love syory crime 25 lakh loan fraud with young woman and got married another young woman pune
love syory crime 25 lakh loan fraud with young woman and got married another young woman pune sakal
Updated on

पुणे : लग्न नोंदणी संकतेतस्थळावर नोंद केल्यामुळे त्या उच्चशिक्षीत दोघांची ओळख झाली. त्यानंतर एकमेकांचा संवाद सुरु झाला. दोघांनीही आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या. तिने त्याच्यावर विश्‍वास ठेवून सर्वस्व अर्पण केले. पुढे मात्र त्याने, केवळ तिच्या भावनांशीच खेळ खेळला नाही, तर तिच्या नावाने बॅंकेचे 25 लाख रुपयांचे कर्ज काढले, दुसऱ्याच तरुणीशी विवाह थाटत तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी खराडी परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शांतनु बाळासाहेब महाजन (वय 28, रा. न्याती इलेशिया, थिटेनगर, खराडी) यास अटक केली आहे.

हा प्रकार 28 मार्च 2022 पासून अद्यापर्यंत सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे एमसीए झाले आहे, तर तरुण एमबीए झालेला आहे. दोघेही उच्चशिक्षत आहेत. दोघांनीही लग्नासाठी एका लग्न नोंदणी संबंधी संकेतस्थळावर त्यांच्या नावाची नोंदणी केली होती. त्यानंतर शांतनुने फिर्यादी तरुणीचा संपर्क क्रमांक मिळवून तिच्याशी मैत्री केली. तरुणीने त्याच्यावर विश्‍वास ठेवल्यानंतर त्यांनी शारिरीक संबंधही ठेवले. त्याचवेळ त्याने फिर्यादीच्या मोबाईलवर फिर्यादीच्या नावाने विविध प्रकारचे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड केले. त्याद्वारे त्याने बॅंकेतून वेळोवेळी 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले. ते पैसे खर्चही केले. त्यानंतर त्याने फिर्यादीसमवेत लग्न करण्यास नकार दिला. तसेच दुसऱ्याच एका तरुणीसमवेत लग्न करुन नवा संसारही थाटला. हा प्रकार समजल्यानंतर तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठून तरुणाविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत त्यास अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.