Lumpy Disease Vaccine: पुणे तिथे काय उणे! कोरोना पाठोपाठ 'लम्पी' रोगावरील लस देखील पुण्यातच होणार तयार

लम्पी रोगावरील लशीचे उत्पादन पुण्यात होणार
Lumpy Disease Vaccine
Lumpy Disease Vaccineesakal
Updated on

Lumpy Disease Vaccine: केंद्रीय संस्थांनी विकसित केलेल्या लम्पी रोगावरील ‘लम्पी प्रोव्हॅक’ या लशीचे तंत्रज्ञान सर्वप्रथम पुण्यातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेकडे (आयव्हीबीपी) नुकतेच हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे गोवंशातील जनावरांसाठी प्राणघातक असलेल्या लम्पी रोगावरील लशीचे उत्पादन पुण्यात होणार आहे.

हेही वाचा: Live Updates: राज्य महिला आयोगाकडून चित्रा वाघ यांना नोटीस

नोव्हेंबरपासून या लशीच्या उत्पादनाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) हरियानातील हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र (एनआरसीई) आणि उत्तर प्रदेशातील बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएआर) या संस्थांनी संयुक्तपणे या लशीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

गेल्या आठवड्यात नागपूर येथे कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री पुरोषोत्तम रुपाला, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संबंधित संस्थांचे प्रमुख अधिकारी यांची एक बैठक झाली.

Lumpy Disease Vaccine
Ghulam Nabi Azad: गुलाम नबी आझाद यांच बंड फसलं १७ नेते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल

त्यामध्ये या लशीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतर राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या पुण्यातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेस करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात सर्वप्रथम पुण्यातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेला लशीचे तंत्रज्ञान देण्यात आले आहे, असे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले.

लम्पी त्वचा रोगावर प्रतिबंधक लशीच्या उत्पादनाचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थेतील अधिकाऱ्यांचा गट हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्रात प्रशिक्षणासाठी जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून लशीचे उत्पादन सुरू केले जाईल. राज्यात एक कोटी ४० लाख गोवंशातील जनावरे आहेत. त्यांना ही लस दिली जाईल, तसेच अन्य राज्यांनाही ही लस पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.